Amitabh Bachchan And Rajinikanth Twitter @LycaProductions
मनोरंजन बातम्या

Thalaivar 170 Movie: तब्बल ३३ वर्षांनंतर दोन सुपरस्टार दिसणार एकत्र; चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Viral Photo: रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

Pooja Dange

Amitabh Bachchan And Rajinikanth Movie:

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत तब्बल ३३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून या चित्रपटाला 'थलायवर १७०' असे बोलले जात आहे.

रविवारी या निर्मात्यांनी चित्रपटाचे बीटीएस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोन्ही सुपरस्टार्सनी एकत्र पोज दिल्या आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'थलायवर १७०' चित्रपटाचे मुंबईतील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर LYCA प्रॉडक्शन अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन ऑफिसमध्ये खुर्चीवर बसले आहेत आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत आहेत. त्यांचा मोबाईल त्यांच्या चेहऱ्याच्या खूप जवळ आहे.

रजनीकांत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बाजूला उभे आहेत आणि फोनमध्ये बघून हसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सफेद शर्ट आणि ग्रे कोट घातला आहे. तर रजनीकांत यांनी ब्राऊन शर्ट घातला असल्याचे दिसत आहे. (Latest Entertainment News)

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा हा फोटो शेअर करत Lyca प्रॉडक्शन यांनी लिहिले आहे की, 'जेव्हा सुपरस्टार आणि शेहेनशाह 'थलायवर १७०'च्या सेटवर भेटतात! ३३ वर्षानंतर झालेले रियुनियन! 'थलायवर १७०'मध्ये डोस आहे!'

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. '३३ वर्षांनी मी पुन्हा माझे मेंटॉर, फिनॉमेनन श्री अमिताभ बच्चन यांच्याबरोबर Lyca प्रॉडक्शनच्या 'थलायवर १७०'मध्ये काम करत आहे. हा चित्रपट टी. जे. दिग्दर्शित करत आहेत. माझे हृदय आनंदाने उड्या मारत आहे.' असे कॅप्शन रजनीकांत यांनी या फोटोला दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT