Rajesh Khanna yandex
मनोरंजन बातम्या

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला केली होती किस, सुपरस्टारबद्दल धक्कादायक दावा

Rajesh Khanna-Anita Advani : राजेश खन्ना यांचे आयुष्य कायम चर्चेत राहिले. त्यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला किस केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना कायम वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले.

राजेश खन्ना आणि अनीता आडवाणी यांच्या नात्यासंबंधित अनेक खुलासे होतात.

राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला किस केल्याचा दावा करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनीता आडवाणी (Anita Advani) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आजवर अनीता आडवाणी यांनी दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अनीता आडवाणी यांनी सांगितल्यानुसार राजेश खन्ना यांनी त्यांना जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला होता. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात. 'राजेश खन्ना - डार्क स्टार' या पुस्तकात राजेश खन्ना यांनी अनीता आडवाणी यांना किस केल्याचा किस्सा सांगितला आहे. अनीता आडवाणी यांनी सांगितल्यानुसार, अनीता आडवाणी तेरा वर्षांची असताना राजेश खन्ना यांनी त्यांना बळजबरी किस केले.

अनीता आडवाणी यांनी काही वर्षांनी जेव्हा झालेल्या प्रकाराचा जाब विचारला तेव्हा राजेश खन्ना यांनी त्यांची माफी मागितली. यानंतर अनीता आडवाणी आणि राजेश खन्ना यांचे अफेअर सुरू झाले. दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना कायम त्यांच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत राहीले. राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

राजेश खन्ना हे अनीता आडवाणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोले जायचे. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर अनिता अडवाणी यांना मोठा धक्का बसला. मीडिया रिपोर्टनुसार, राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांनी अनिता अडवाणी यांना अंतिम संस्कारांमध्ये सहभागी होऊ दिले नाही. त्या काळातही राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी बोल्या जात होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

SCROLL FOR NEXT