Rajesh Khanna and Twinkle Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajesh Khanna: राजेश खन्नांच्या आठवणीत मुलगी झाली भावुक, शेअर केला खास फोटो

ट्विंकलने वडील राजेश यांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

Pooja Dange

Rajesh Khanna Birthday Special: बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज ८० वा जन्मदिन आहे. राजेश खन्ना यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून ते आपल्यात नेहमीच राहतील. राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभिनेते राजेश खन्नासह आज त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना हीच सुद्धा वाढदिवस आहे.

२९ डिसेंबर १९७४साली ट्विंकल खन्नाचा जसलोक हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. ट्विंकल आणि राजेश यांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने ती नेहमीच तिच्या वडिलांना यादिवशी मिस करते. ट्विंकलने वडील राजेश यांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ट्विंकल आणि राजेश खन्ना एकत्र दिसत आहेत. तसेच ते दिघेंही खूप आनंदी दिसत आहेत. (Celebrity)

ट्विंकल खन्नाने हा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन देखील दिले आहे. 'एक बिटरस्वीट म्हणजे एकाच दिवशी वाढदिवस आणि आयुष्यभराच्या आठवणी'. या कॅप्शन ट्विंकलने एक हार्ट ईमोजी सुद्धा शेअर केला आहे. (Birthday)

ट्विंकल खन्ना हिला एक बहीण सुद्धा आहे.जिचे नाव रिंकू आहे. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी १९७३साली लग्न केले होते. परंतु १९८२साली ते दोघे वेगळे झाले. जेव्हा राजेश खन्ना यांची निधन झाले तेव्हा ते घरी एकटेच होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT