Sushmita sen Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen: 'ताई तू लवकर बरी हो आणि....' सुष्मिताच्या भावडांनी आजारपणावर दिली भावूक प्रतिक्रिया

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sushmita Sen Health Update: सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील सुपरफिट अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही सुष्मिताने स्वताला फिट ठेवले आहे. ती नेहमीची तिच्या फिटनेसचे सल्ले सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. मात्र नुकत्याच आलेल्या सुष्मिताच्या या बातमीने सर्वानाच धक्का बसला आहे. सुष्मिता सेनने तिला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

सुश्मिता सेननं एका पोस्टच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. तिनं वडीलांसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं की,''माझे वडील मला म्हणाले शोना तुझं मन आनंदी ठेवलंस,मजबूत ठेवलंस तर ते तुझ्या पाठीशी खंबीर उभं राहील जेव्हा तुला गरज असेल तेव्हा''.''मला काही दिवसांपूर्वीच हार्टअटॅक आला होता. माझी एन्जियोप्लास्टी झाली आहे. आणि माझे कार्डिओलॉजिस्ट म्हणाले,तुझं हार्ट खूप मोठं आहे'.

नुकतेच सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. अनेकदा राजीव आणि सुष्मिता एकमेकांच्या सुखा: दुखात सहभागी होताना दिसतात. गुरूवारी आलेल्या सुष्मिताच्या बातमीवर व्यक्त होताना राजीवने फोटो शेअर करत त्याने टू माय स्ट्रॉन्गेस्ट .... भाई लव यू मोस्ट मोस्ट. असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी सुष्मिताला हार्टअटॅक आला असून तिची एन्जियोप्लास्टी झाल्याचं देखील सांगितलं आहे.राजीव सेनच्या नंतर चारू असोपा ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे तिने 'लव यू दीदी आप सबसे स्ट्रॉंग महिला हो' असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून सुष्मिताच्या पोस्टवर सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Edited By- Manasvi Choudhary

GK: असे कोणते फळ आहे जे अर्धे कापल्यावर भाजी बनते?

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

SCROLL FOR NEXT