Raja Shivaji 2 Saam tv
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji 2: 'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? या अभिनेत्याने दिली मोठी हिंट, म्हणाला...

Raja Shivaji 2: ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या दुसऱ्या भागाबाबत संकेत मिळाले आहेत. अभिनेता कपिल होनरावच्या वक्तव्यामुळे सिक्वेलची चर्चा रंगली असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Raja Shivaji 2: अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळवला आहे. या सिनेमाच्या यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची चर्ची सोशल मिडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे, या चर्चांना अभिनेता कपिल होनरावच्या एका वक्तव्यामुळे आणखी बळ मिळाले आहे.

कपिल होनराव हा मराठी मालिकांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता असून, ‘राजा शिवाजी’ चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. अलीकडेच त्याने केलेल्या एका पोस्टमुळे या चित्रपटाच्या पुढील भागाबाबत एक विधान केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे ‘राजा शिवाजी पार्ट 2’ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कपिलने सोशल मीडियावर 'राजा शिवाजी'चे पडद्यामागचे अनुभव शेअर केले आहेत. यात कपिल तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकताना दिसतोय. ही पोस्ट करुन कपिलने लिहिले, ''राजा शिवाजी आता फक्त एक फिल्म नाही… तो प्रत्येकाच्या मनातली भावना बनला आहे. या चित्रपटामुळे माझ्यासारख्या टीव्ही अभिनेत्याला नॅशनल लेव्हलवर ओळख मिळाली, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. २ महिने तलवारबाजी, घोडेस्वारी आणि खूप कडक ट्रेनिंग… त्या सगळ्या मेहनतीमागे एकच स्वप्न होतं मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहण्याचं.''

त्याने पुढे लिहिले, ''खूप काही आहे जे शब्दात मांडता येणार नाही… पण हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि या सगळ्यामागे एक माणूस... रोहन मापुस्कर दादा. तो माझ्यासाठी फक्त casting director नाही, तर मोठा भाऊ. सेटवर तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण — आयुष्यभर लक्षात राहील. Thank you so much दादा… मला राजा शिवाजीचा भाग बनवण्यासाठी. जय भवानी… जय शिवाजी! भेटू लवकरच...राजा शिवछत्रपती.

कपिल होनरावने या पोस्टमधून, भेटू लवकरच असे लिहून या चित्रपटाचा दुसरा भाग येऊ शकतो असे संकेत दिले आहेत. जरी या बातमीची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली, तरीही निर्माते आणि टीमकडून या प्रकल्पाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक प्रकल्प आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. याशिवाय जेनिलिया देशमुख संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचीही यात भूमिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT