Raj Thackeray On Khupte Tithe Gupte Saam tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray On Khupte Tithe Gupte : राज ठाकरेंनी लावला थेट महाराजांना फोन; म्हणाले, माझी इच्छा आहे की...

Avdhoot Gupte show khupte tithe gupte : पहिल्याच एपिसोडमध्ये राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे.

कोमल दामुद्रे

Zee Marathi Show : अवधुत गुप्ते हा त्याच्या गाण्यामुळे बरेच चर्चेत असतो. गायक, संगीत दिग्दर्शक व दिग्दर्शक असा त्याचा चेहरा. पण लवकरच तो त्याच्या एका नव्या शोमुळे प्रेषकांच्या भेटीला येणार आहे.

अवधुत गुप्तेचा झी वाहिनीवर (Zee Marathi) खुपते तिथे गुप्ते हा नवा शो प्रेषकांच्या भेटीला उद्यापासून सुरु होणार आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे. त्यात अनेक राजकीय किस्से व गोष्टी उलघडल्या जाणार आहे. यामध्ये चक्क राज ठाकरे हे थेट छत्रपती शिवाजी महारांजाना फोन लावणार आहे. झी च्या सोशल मीडियावरुन (Social Media) हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

1. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरेंची हजेरी

हा कार्यक्रम ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमात पहिलेच पाहुणे म्हणून राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. तो प्रोमोही प्रचंड व्हायरल झाला होता. त्यात ते त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यावर बोलले होते. या कार्यक्रमाची उत्सुकता प्रचंड वाढताना दिसत आहे.

2. राज ठाकरेंची छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची इच्छा

नुकताच कार्यक्रमाचा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात अवधुत गुप्ते राज ठाकरेंना जादुच्या फोनविषयी सांगत आहे. अवधुत गुप्ते म्हणतात की, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींला फोन लावू शकतात. त्यावेळी राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महारांजाना फोन लावण्याची इच्छा व्यक्त केली. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

3. राज ठाकरें महाराजांशी काय बोलले?

खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात राज ठाकरेंना जादुच्या फोनविषयी सांगितले असता त्यांनी शिवाजी महाराजांना फोन करण्याची इच्छा व्यक्त केली. अवधुत गुप्ते म्हणाला "हा एक जादुई फोन आहे. तो तुमच्या मनातील व्यक्तीशी आपोआप कनेक्ट होईल."त्यावर राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी खासकरुन महाराष्ट्रात पुन्हा उतरावं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगाव की तुम्ही कशासाठी झगडलात?" राज ठाकरेंच्या या उत्तरावर तिथे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. या प्रोमोवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT