मनोरंजन बातम्या

Raj Kundra: ईडीच्या छाप्यानंतर राज कुंद्राचं वक्तव्य, 'माझ्या पत्नीचे नाव...'

Raj Kundra and Shilpa Shetty: राज कुंद्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक निवेदन जारी करून पत्नी शिल्पा शेट्टीचे नाव ओढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Dhanshri Shintre

पॉर्नोग्राफी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 29 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा टाकला होता. त्याच्यावर आरोप आहे की तो व्हॉट्सॲप मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रौढ सामग्री प्रसारित करत होता. ईडीच्या छाप्याच्या एका दिवसानंतर राज कुंद्रा यांनी एक निवेदन जारी केले असून या सगळ्यामध्ये त्यांची पत्नी शिल्पा शेट्टीचे नाव ओढू नये, असे म्हटले आहे.

त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना राज कुंद्राने लिहिले की, मी गेल्या चार वर्षांपासून तपासात सहकार्य करत आहे. आणि जोपर्यंत पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंगचा संबंध आहे, सत्य लपून राहणार नाही. शेवटी न्यायाचाच विजय होईल.

शिल्पा शेट्टीचे समर्थन करत त्यांनी लिहिले, माझ्या पत्नीचे नाव असंबंधित प्रकरणांमध्ये पुन्हा पुन्हा ओढले जाणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. सीमांचा आदर करा. ईडीचा मनी लाँड्रिंगचा तपास हा अश्लील मजकूर तयार करणे आणि मोबाइल ॲप्सद्वारे वितरणाशी संबंधित आहे. राज कुंद्राचे नाव 2021 साली पोर्नोग्राफी प्रकरणातही जोडले गेले होते. त्यावेळी त्याला अटकही झाली होती, त्यानंतर त्याने 2 महिने तुरुंगात काढले आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

राज कुंद्रापूर्वी शिल्पा शेट्टीच्या वकिलानेही या प्रकरणी निवेदन जारी केले होते आणि शिल्पा शेट्टीचे नाव आणि फोटो वापरणं टाळा, कारण तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

SCROLL FOR NEXT