OTT Entertainment: ओटीटीवर 'या' आठवड्यात मनोरंजनाचा अधिकमास

ओटीटीची वाढती मागणी पाहता नेहमीच चित्रपटासाठी काहीतरी नवीन आशय प्रेक्षकांच्यासमोर सादर करु शकतील. येत्या आठवड्यात अनेक वेबसीरिजचे आगामी सीझन येणार आहेत.
ott platform
ott platformSaam Tv

मुंबई: सध्या अनेक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकवर्ग थिएटरमध्ये कमी ओटीटीवर (OTT) चित्रपट पाहण्यासाठी अधिक उत्सुक असतात. ओटीटी नेहमीच प्रेक्षकांकरिता नवनवीन आशय भेटीला आणत असतात. ओटीटीची वाढती मागणी पाहता नेहमीच चित्रपटासाठी काहीतरी नवीन आशय प्रेक्षकांच्यासमोर सादर करु शकतील. येत्या आठवड्यात अनेक वेबसीरिजचे (WebSeries) आगामी सीझन येणार आहेत. चला तर एक नजर टाकुया कोणकोणते वेबसीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ott platform
Jhalak Dikhla Jaa 10: अली असगर रातोरात शोमधून बाहेर, कारण जाणून चाहत्यांना बसला धक्का !

ड्युड सीजन २ (Dude Season 2)

अॅमेझोन मिनी टिव्हीवर (Amazon Mini Tv) आगामी वेबसीरिज 'ड्युड सीजन २' ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सीजनला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर ड्युडचा पुढील सीझन येणार आहे. सीरिजच्या भागात तुम्हाला आणखी रोमांच, ट्विस्ट आणि अनेक ट्वीस्ट सुद्धा पाहायला मिळतील. ही वेबसीरिज २० सप्टेंबरपासून अॅमोझॉन मिनी टिव्हीवर पाहता येणार आहे.

ott platform
राजू श्रीवास्तव अद्यापही बेशुद्ध; डॉक्टरांनी सांगितले 'हे' कारण

हश-हश (Hush-Hush)

मर्डर मिस्त्रीही वेबसीरिज ओटीटी वर चांगलीच दहशत निर्माण करणार आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या वेबसीरिजची कथा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला सोबत आयेशा जुल्का ओटीटी विश्वात पदार्पण करीत आहेत. सोबतच वेबसीरिजमध्ये सोहा अली खान आणि कृतिका कमरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही वेबसीरिज येत्या २२ सप्टेंबर रोजी अॅमेझोन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होणार आहे.

ott platform
Bigg Boss 16 : 'ही' राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री होणार बिग बॉसची स्पर्धक

जामतारा २ (Jamtara)

नेटफ्लिक्सवर आणि सोबतच वेबविश्वात खळबळ उडवणारी 'जमतारा २' ही वेबसीरिज या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्राईम थ्रिलर असणारी 'जमतारा' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंदीस उतरली होती. येत्या आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ott platform
ब्रह्मास्त्रची नवी झेप; 'द कश्मीर फाइल्स'ला मागे टाकत ठरला या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट

बबली बाऊंसर (Babli Bouncer)

उत्तर भारतातील असोला फतेपूर येथील 'बाउंसर टाऊन' वर आधारित 'बबली बाऊंसर' चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. बबली बाऊंसर हा चित्रपट मधुर भांडारकर दिग्दर्शित २३ सप्टेंबर रोजी डिज्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटात मुख्य भूमिका तमन्ना भाटियाची आहे.

ott platform
Jacqueline Fernandez : जॅकलिनसोबतच 'या' फॅशन डिझायनरची होणार चौकशी

अतिथी भूतो भव: (Atithi Bhutoo Bhava)

हार्दिक गज्जर दिग्दर्शित 'अतिथी भूतो भव:' हॉरर कॉमेडी चित्रपटही या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रतिक श्रीकांत शिरोडकरची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा हॉरर गोष्टींभोवती फिरत आहे. चित्रपटात प्रतिकसोबतच जॅकी श्रॉफ, शरमीन सेगल आणि दिविना ठाकुर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून झी५ (ZEE 5) वर प्रदर्शित होत आहे.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com