Raj Babbar Unseen Story Facebook
मनोरंजन बातम्या

HBD Raj Babbar : राज बब्बर यांच्या सिनेमापेक्षा त्याचं पर्सनल आयुष्य जास्त रंजक, जाणून घ्या काय घडलंय एवढं

Raj Babbar Unseen Story : स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेमकथा बी-टाऊनमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

Pooja Dange

Raj Babbar Life : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा आज म्हणजेच २३ जूनला वाढदिवस आहे. इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांच्या यादीत राज बब्बर यांची गणना होते. राज यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक दर्जेदार हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे त्यांचे आजही लाखो चाहते आहेत.

नायकाची भूमिका असो वा खलनायकाचा त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. एक यशस्वी अभिनेते तर ते आहेतच त्याचाशी राज एक निपुण राजकारणी देखील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, राज बब्बर यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. (Latest Entertainment News)

राज बब्बर म्हटलं तर आपसूक नाव येत ते 80 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री स्मिता पाटील यांच. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेमकथा बी-टाऊनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. राजच्या प्रेमात पडलेल्या स्मिता यांनी त्या काळात एवढं मोठं पाऊल उचललं होतं, याचा विचार करायला आजही लोक घाबरतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्मिता पाटील आणि राज बब्बर 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'भीगी पालके' चित्रपटादरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते.

हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. राज बब्बर आधीच विवाहित होते आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. राज बब्बरने नादिराला घटस्फोट देऊन स्मिता पाटीलशी लग्न केले. मात्र, मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी स्मिताचे निधन झाले.

राज बब्बर यांचा एक मनोरंजक किस्साही खूप प्रसिद्ध आहे. एका चित्रपटात झीनत अमानसोबत राज बब्बर यांना बलात्काराचा सीन करायचा होता. हा सीनमुळे राज बब्बर खूप घाबरले होते. जेव्हा झीनत अमानला त्यांनी त्यांच्या भीतीबद्दल सांगितले, तेव्हा झीनतने राज बब्बरसोबत बलात्काराच्या सीनची अनेक वेळा रिहर्सल केली आणि त्यांना समजावून सांगितले की शूट दरम्यान, त्यांनी शक्य तितके क्रूर दिसले पाहिजे आणि बलात्काराचा सीन असा केले पाहिजे की ते खरे वाटेल.

राज बब्बर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 'प्रेम गीत', 'उमराव जान', 'निकाह', 'अगर तुम ना होते', 'मजदूर', 'मेहंदी', 'आज' की आवाज', 'हकीकत', 'सलमा' यांचा सारखे अनेक हिट चित्रपट दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT