Raid 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office Collection : अजय देवगणच्या 'रेड २'नं 'सिंघम रिटर्न्‍स'ला टाकलं मागे, लवकरच पार करणार २०० कोटींचा टप्पा

Raid 2 Box Office Collection Day 17 : अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आता 'सिंघम रिटर्न्‍स'ला मागे टाकले आहे.

Shreya Maskar

अजय देवगण ( Ajay Devgn) आणि रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) यांचा 'रेड 2' (Raid 2) चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता 'रेड 2'ने 'सिंघम रिटर्न्स'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'सिंघम रिटर्न्स' 2014 साली रिलाज झाला. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'रेड 2' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'रेड 2'चा नवीन रेकॉर्ड

अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या 'रेड 2' चित्रपटाने 'सिंघम रिटर्न्स' कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. 'रेड 2'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 143.38 चा व्यवसाय केला आहे. तर 'सिंघम रिटर्न्स'ने मीडिया रिपोर्टनुसार, 140.6 कोटींची कमाई केली आहे. 'सिंघम रिटर्न्स' हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत करीना कपूर खान देखील पाहायला मिळत आहे. 'रेड २' चित्रपट 'सिंघम रिटर्न्स'ला मागे टाकत अजय देवगणचा 7वा सर्वात हिट आणि जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'रेड 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 17

  • दिवस पहिला - 19.25 कोटी

  • दिवस दुसरा - 12 कोटी

  • दिवस तिसरा - 18 कोटी

  • दिवस चौथा - 22 कोटी

  • दिवस पाचवा - 7.50 कोटी

  • दिवस सहावा - 6.75 कोटी

  • दिवस सातवा - 4.52 कोटी

  • दिवस आठवा - 5.33 कोटी

  • दिवस नववा - 5 कोटी

  • दिवस दहावा - 8 कोटी

  • दिवस अकरा - 11.75 कोटी

  • दिवस बारावा - 4.85 कोटी

  • दिवस तेरावा - 2.6 कोटी

  • दिवस चौदा - 3.35 कोटी

  • दिवस पंधरा - 3 कोटी

  • दिवस सोळावा - 3 कोटी

  • दिवस सतरा - 4.15

  • एकूण - 143.38 कोटी

'रेड 2' ओटीटी अपडेट

अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 'रेड २' चित्रपट जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. चाहते 'रेड 2' घरबसल्या पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'रेड 2' भविष्यात अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करेल.

'रेड 2' स्टारकास्ट

'रेड 2' चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिकाची साकारली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT