Raghav- Parineeti Engagement Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raghav- Parineeti Engagement Update: क्यूट कपलच्या साखरपुड्याला असणार विशेष थीम; प्रियंकासह ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी...

साखरपुड्यानिमित्त दोघांच्या घराला रोषणाई करण्यात आली असून या क्यूट कपलच्या साखरपुड्यासाठी खास थीम ठेवण्यात आली आहे.सोबतच साखरपुड्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

Chetan Bodke

Raghav- Parineeti Engagement: आज बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा आज साखरपुडा होणार आहे, ही जोडी दिल्लीत आपला साखरपुडा करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू आहे. साखरपुड्यानिमित्त दोघांच्या घराला रोषणाई करण्यात आली असून या क्यूट कपलच्या साखरपुड्यासाठी खास थीम ठेवण्यात आली आहे.सोबतच साखरपुड्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

गेल्या काही दिवसांपुर्वीच या जोडीला माध्यमकर्मींनी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. साखरपुड्याच्या तयारीसाठी ही जोडी आधीच दिल्लीला गेली होती. ड्रेसपासून डेकोरेशनपर्यंत सर्व काही खास थीमने तयार केले जाणार आहे.

परिणीती-राघव दोघेही पंजाबी कुटुंबातील असल्याने त्यांचा साखरपुडा पंजाबी पद्धतीनेच पार पडणार आहे. साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाणार असून ही जोडी एकमेकांच्या हातात अंगठी घालून साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडतील. सोबतच कार्यक्रमात जेवणाचे देखील वेगवेगळे मेन्यू ठेवण्यात आले आहेत.

साखरपुड्यासाठी यावेळी १५० लोकांना आमंत्रित करण्यात येणार असून यामध्ये दोघांच्याही कुटुंबियांसोबतच जवळचे मित्र देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. परिणीतीची चुलत बहिण आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा- जोनास देखील दिल्लीमध्ये नुकतीच आली असून सहपरिवार साखरपुड्याला उपस्थित राहणार आहे.

मुख्यबाब म्हणजे या क्यूट कपलच्या साखरपुड्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेते उपस्थित राहणार आहेत. आमंत्रण देण्यात आलेल्या पाहुण्यांमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, सानिया मिर्जा, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, फराह खान, करण जोहर यांचा समावेश आहे.

तर काही केंद्रीय पातळीवरील राजकीय नेते देखील या सारखपुड्याला उपस्थिती लावणार आहेत.

राघव- परिणीतीच्या साखरपुड्याला पेस्टल कलर्स आधारित थीम ठेवली आहे. परिणीती मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करणार आहे. तर साखरपुड्यासाठी राघव आणि त्यांचे मामा फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान करणार आहे. साखरपुड्यासाठी हे दोघेही खास लूक परिधान करणार असल्याने सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लूकची कमालीची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT