Radhika Apte : मराठमोळी हरहुन्नरी अभिनेत्री राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी एका गोड लहान बाळाला जन्म दिला आहे. अनेक महिन्यांपासून प्रेग्नन्सी लपवल्यानंतर तिने एका कार्यक्रमात चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आणि आता एका पोस्टद्वारे तिने गोड परीची आई झाल्याची घोषणा केली आहे.
राधिकाने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवते. लग्नाच्या एका दशकानंतर, राधिका आपटे आणि बेनेडिक्ट टेलरने त्यांच्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण चाहत्यांना तिच्या लग्नाबद्दल अनेक वर्षांनी कळले.
बाळासोबतचा राधिकाचा पहिला फोटो
राधिका आपटेने आपल्या मुलीला जन्म देताच तिच्या कामाला सुरुवात केली आहे, तिने आपल्या बाळासोबतच्या पहिल्या पोस्टमध्येच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना कळवले आहे. राधिका आपटेने काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हे चित्र त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याच्या संतुलनाचा पुरावा आहे. या फोटोमध्ये काम करता करता राधिका आपल्या मुलीला स्तनपानही करत आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या ब्लॅक हायनेकमध्ये अप्रतिम दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना राधिका आपटेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "जन्मानंतर, मी पहिल्यांदा माझ्या बाळाला फिडींग करताना काम करत आहे." यासोबतच तिने breastfeed, mother at work, baby girl and girls are the best असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. यावरून लक्षात येते की, अभिनेत्री बाळाच्या स्वागतासाठी खूप आनंदी आहे.
राधिका आपटेचा नवरा कोण आहे?
राधिका आपटेने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. राधिकाचा नवरा लंडनचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने ब्रिटिश व्हायोलिन वादक, संगीतकार आहे. बेनेडिक्ट परदेशात राहतो आणि राधिका अनेकदा तिचे काम सांभाळून परदेश वाऱ्या करत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.