Queen Elizabeth II and Amitabh Bachchan Saam tv
मनोरंजन बातम्या

महानायक अमिताभ बच्चन यांनी नाकारले होते महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निमंत्रण, जाणून घ्या काय होते कारण?

महाराणी एलिझाबेथ यांनी अमिताभ बच्चन यांना निमंत्रण पाठवले होते. परंतु, बिग बींनी त्यांचे निमंत्रण नाकारले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय(Queen Elizabeth II) यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगात शोककळा पसरली असून प्रत्येकजण,या दुखद घटनेला एका युगाचा अंत म्हणत आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनाही एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. वास्तविक, महाराणी एलिझाबेथ यांनी अमिताभ बच्चन यांना निमंत्रण पाठवले होते. परंतु, बिग बींनी त्यांचे निमंत्रण नाकारले होते.

राणी एलिझाबेथने फेब्रुवारी २०१७ च्या अखेरीस बकिंगहॅम पॅलेस येथे राजघराण्याच्या वतीने 'यूके-इंडिया इयर ऑफ कल्चर' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये जगभरातून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या अंतर्गत त्यांनी बॉलिवूडचे मेगास्टार आणि देशातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केले होते. मात्र, अमिताभ बच्चन यांनी या भव्य कार्यक्रमाचे राणीने पाठवलेले निमंत्रण नाकारले होते.

अमिताभ बच्चन यांच्या सहायकाने एक निवेदन जारी करून राणीने चे आमंत्रण नाकारण्याचे कारण स्पष्ट केले. त्यात लिहिले होते, 'होय, मिस्टर बच्चन यांना बकिंगहॅम पॅलेस येथे 'यूके-इंडिया इयर ऑफ कल्चर' रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी राणी एलिझाबेथकडून खूप खास आमंत्रण मिळाले आहे, परंतु दुर्दैवाने त्यांनी आधीच केलेल्या एका वचनबद्धतेमुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नव्हते.'

गुरूवारीच राणीची तब्येत नाजूक असल्याची बातमी कळताच त्यांना तात्काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. राणी एलिझाबेथ द्वितीय त्यांच्या शेवटच्या दिवसात बालमोरल कॅसलमध्ये होत्या जिथे त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

SCROLL FOR NEXT