Srivalli | Khaki Studio | Pushpa | Mumbai Police Band Saam TV
मनोरंजन बातम्या

मुंबई पोलिसांनाही पुष्पाराजचं फॅड; श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स (पहा Video)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अल्लू अर्जूनने साकारलेल्या पुष्पाचं येड अवघ्या देशाला लागलंय. चित्रपट रिलीज होऊन २ महिने उलटले पण पुष्पाराजची (Pushpa: The Rise) क्रेझ काही कमी झालेली नाही. सेलिब्रिटींपासून अगदी राजकारण्यापर्यंत सगळ्यांनाच या चित्रपटातं येड लागलं. खासकरुन श्रीवल्ली हे गाणं आणि 'मैं झुकेगा नहीं साला' हा डायलॉग भरपूर व्हायरल झाला. त्यावर लाखो रील्सही बनली. मुंबई पोलिसही (Mumbai Police) पुष्पा फिवरपासून वाचू शकलेले नाही. मुंबई पोलिसांचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Pushparaj craze to Mumbai police too; Khaki Studios Abandoned Performance on Srivalli Song Watch the Video)

हे देखील पहा -

मुंबई पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या मुंबई पोलिस बॅन्ड पथक (खाकी स्टुडिओ) यांनी ‘पुष्पा: द राइज’ सिनेमातलं श्रीवल्ली हे गाणं बॅन्डवर वाजवलं. (Srivalli | Khaki Studio | Pushpa | Mumbai Police Band) यात ड्रम, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, बासरी अशा अनेक वाद्यांच्या समावेश करत श्रीवल्ली गाण्याचं बॅन्ड व्हर्जन तयार करण्यात आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून या व्हिडिओला (Viral Video) आत्तापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. लोकं या व्हिडिओला चांगलीच पसंती देत आहेत. या व्हिडिओला त्यांनी 'मुंबई पोलिसांची सुरेल सफर कभी ‘रुकेगा नहीं’' असं कॅप्शन दिलयं.

याआधीही मुंबई पोलिसांच्या बॅन्ड पथकाने लतादीदींचं ऐ मेरे वतन के लोगो, मनी हाईस्ट मधलं बेला चाव, मेरे सपनों की राणी, जय हो, जय - जय महाराष्ट्र माझा, जेम्स बॉन्ड थीम अशी अनेक गाणी हे बॅन्डच्या स्वरुपात सादर केली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT