Producer gave an update about Pushpa The Rule  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Update: 'पुष्पा २'च्या प्रोमोमधून अल्लू अर्जुनच गायब; चाहत्यांची होणार का निराशा?

Pushpa The Rule Trending: चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरवर 'पुष्पा 2'चा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Pushpa The Rule Promo Out: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘पुष्पा २’मुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन वर्षांपूर्वी अल्लूने पुष्पा या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.

या चित्रपटातील गाणी, संवाद सगळे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. चित्रपटाला दोन वर्ष जरी उलटून गेली चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. आता प्रेक्षक अल्लू अर्जुनच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2' ची आतुरतेने वाट असताना 'पुष्पा-द रुल'बाबत एक मोठी अपडेट समजली आहे.

चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरवर 'पुष्पा 2'चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तो आता कुठे आहे, त्याचा पत्ता 7 एप्रिलला दुपारी 4 वाजता समजेल. 'The search ends soon!' असे टीझरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

अल्लू अर्जुन आणि 'पुष्पा द रुल' सोशल मीडियावर टॉपवर ट्रेंड करत आहेत. या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये पुष्पा 2 बद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पा 2 च्या स्टार कास्टमध्ये काही मोठ्या नावांचा समावेश करणार आहेत. या यादीत बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या नावांचा समावेश आहे. या यादीत सलमान खान आणि अजय देवगण यांच्या नावाची चर्चा होत आहे . मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

पुष्पा या चित्रपटाने पडद्यावरचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुष्पा चित्रपटाचे बजेट 200-250 कोटी होते. त्याचवेळी पुष्पा 2 चे बजेट 350 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

कालपासूनच या चित्रपटाची चर्चा होती. निर्माते चित्रपटामध्ये बदल करणार असल्याचे बोलले जात होते. चित्रपटातील बदलामुळे चित्रपट प्रदर्शित व्हायला उशीर होईल असे सांगण्यात आले होते.

अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार होता. तर आज चित्रपटातील अभिनेत्री रश्मिकाचा वाढदिवस आहे आणि या दिवशी चित्रपटाचा छोटा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT