Pushpa 2 : सध्या पुष्प २ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुनने ज्याप्रकारे ‘पुष्पराज’ला जिवंत केले, रश्मिका मंदान्नाने ‘श्रीवल्ली’ आणि फहद फासिलने ‘भंवर सिंग शेखावत’ची ऑन-स्क्रीन भूमिका साकारली आहे, त्याचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट देशांतर्गत आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगला व्यवसाय करत आहे. आज हा चित्रपट १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे आणि १००० कोटींचा टप्पा गाठणारा वर्षातील दुसरा सर्वात जलद चित्रपटाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. पण गुगलवर कृणाल पांडे पुष्पा २ सोबत ट्रेंडिंग का आहे? प्रत्येकजण कृणालला पुष्पा २ खलनायकाशी का जोडतो?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपट पुष्पा २ प्रदर्शित झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. तथापि, चित्रपटातील एक अनपेक्षित गोष्ट समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनली आहेत. यात आणखी एका गमतीशीर चर्चेची भर पडली आहे. चित्रपटात दाखवलेला खलनायक म्हणजेच तेलुगू अभिनेता तारक पोनप्पाने या चित्रपटात कॅमिओ केलं आहे. पण या चित्रपटात त्याचा लुक हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ भारतीय क्रिकेटपटू कृणाल पंड्या याच्यासारखे असल्याचे चाहते बोलत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्स आणि चर्चांचा उधाण आले आहे.
तारक पोनप्पा यांनी चित्रपटात बुग्गी रेड्डीची भूमिका साकारली आहे, जो केंद्रीय मंत्री कोगतम वीरा प्रताप रेड्डी यांचा पुतण्या आहे. पुष्पा २ मध्ये बुग्गीची व्हिलन म्हणून ओळख होते. तो पुष्पाचा सावत्र भाऊ पण वैरी असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील त्याच्या कामगिरीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी, त्याच्या दिसण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहते तारकचा लूक आणि कृणालच्या लुक मधील साम्य दाखवत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर हा एक विनोदी ट्रेंड सुरु आहे.
पुष्पा २ च्या आधी, तारक पोनप्पाने देवरा: भाग १ मध्ये देखील काम केले आहे. देवरा: भाग १ मध्ये ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते. तारक पोनप्पा यांनी सुपरस्टार यशच्या केजीएफ चॅप्टर २ चित्रपटात दया ही भूमिका साकारली आणि लोकांना प्रभावित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.