Keerthy Suresh Wedding : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशचा थाटात पार पडला विवाह सोहळा, पहा Photo...

Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि अँटनी थट्टिल अडकले विवाह बंधनात. तिच्या मोठ्या दिवशी लाल साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये अभिनेता सुंदर दिसत होता.
Keerthy Suresh Wedding
Keerthy Suresh Wedding Instagram
Published On

Keerthy Suresh Wedding : बेबी जॉन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशने गोव्यात तिचा प्रियकर बिझनेसमॅन अँटोनी थट्टिलसोबत लग्न केले. आज म्हणजेच १२ डिसेंबर २०२४ रोजी विवाहसोहळा पार पडला. या विवाहा सोहळ्याचे छायाचित्रे अभिनेत्रीने काही वेळापूर्वीच तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटो शेअर करताना कीर्तीने 'फॉर द लव्ह ऑफ नायके' हे हॅशटॅग तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. कीर्ती सुरेश आणि अँटोनी थट्टिल यांनी अय्यंगार यांनी दाक्षिणात्य पारंपरिक पद्धतीने लग्न केले. कीर्तीने तिच्या लग्नासाठी पिवळा आणि हिरवा मदिसार (एक प्रकारचा ड्रेप) घातलेला दिसला आणि दंडाला बन घातला होता, ज्याला आंदल कोंडाई म्हणतात.

कीर्ती सुरेशने प्रामुख्याने तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. कीर्ती एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अबिनेटरी असून तिला पाच SIIMA पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह दक्षिणेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२१ च्या फोर्ब्स इंडियाच्या ३० अंडर च्या यादीत देखील कीर्तीने स्थान मिळवले आहे.

Keerthy Suresh Wedding
Nayanthara VS Dhanush : नयनताराने स्पष्ट केले तिने धनुषला खुले पत्र का लिहिले ; म्हणाली मला जे योग्य वाटते...

कीर्ती सुरेश ही चित्रपट निर्माता जी. सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे .तिने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला बाल अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि फॅशन डिझाईनचा अभ्यास केल्यानंतर ती चित्रपटांमध्ये परतली. २०१३ मल्याळम चित्रपट गीतांजलीमध्ये तिची पहिली मुख्य भूमिका होती. वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर कीर्ती सुरेश रेंडु जेला सीता या तेलुगू आणि कन्निवेदी तामिळ या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com