Nayanthara VS Dhanush : नयनताराने स्पष्ट केले तिने धनुषला खुले पत्र का लिहिले ; म्हणाली मला जे योग्य वाटते...

Nayanthara Unhappy with Dhanush : नयनताराने गेल्या महिन्यात धनुषला एक खुले पत्र लिहून तिची डॉक्युमेंटरी नयनतारा : बेयोंड द फेरी टेलमध्ये धनुषच्या प्रोडक्शनमधील क्लिपचा वापर का केला, याचे उत्तर एका मुलाखतीत दिले.
Nayanthara VS Dhanush
Nayanthara VS DhanushGoogle
Published On

Nayanthara VS Dhanush : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराच्या आयुष्य आणि करिअरवर आधारित माहितीपट 'नयनतारा : बेयोंड द फेरी टेल' नेटफ्लिक्स या ओटीटी मध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या माहितीपटात अभिनेता आणि निर्माता धनुषच्या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘नानुम रावडी धान’ या चित्रपटातील छोटा व्हिडीओ वापरल्यामुळे धनुषने तिला १० कोटी रुपये दंडाची कायदेशीर नोटीस पाठवली होती.

या प्रकरणावर लेडी सुपरस्टार नयनताराने सोशल मीडियावर खुले पत्र शेअर करण्यापूर्वी धनुषशी कनेक्ट होण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे. अभिनेत्रीने खुलासा केला की तिने धनुषशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कारण तिला त्याच्या सर्व शंकांचे निरसन करायचे होते. मात्र धनुषने तिला दोन वर्षांपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही.

एका मुलाखती दरम्यान, नयनताराने कबूल केले, ते दोघे मित्र होते आणि पण त्यांचे नाते गेल्या अनेक वर्षांपासून बिघडले आहे. परंतु, ती त्याच्या कायदेशीर कारवाई बद्दल रागावली नाही. नयनतारा म्हणाली, जेव्हा मी काहीतरी माझं नसलेल घेत असेन तेव्हा मी घाबरले पाहिजे. पण, मी तसे करत नसल्यामुळे, मला घाबरण्याची गरज नाही. जर मी आता बोलले नाही तर, गोष्टी खूप पुढे निघून जातील, मला जे योग्य वाटते ते करायला मी का घाबरू? मी काही चुकीचे करत असेल तरच मला घाबरायला हवे. केवळ प्रसिद्धीसाठी कोणाची तरी प्रतिमा खराब करू पाहणारी मी नाही. त्यामुळे हा कोणत्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट नाही.

Nayanthara VS Dhanush
Chhaya Kadam : मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची कान्स चित्रपट महोत्सवानंतर आणखी एक वैश्विक झेप...

नयनतारा पुढे म्हणाली, हे खुले पत्र तीला माहितीपटाची प्रसिद्धी व्हावी या हेतूने पाठवायचे नव्हते. नयनतारा : बेयोंड द फेरी टेल "माहितीपट एखाद्या व्यक्तीला अधिक जाणून घेण्याबद्दल आहे. 'नानुम राउडी धान' या चित्रपटातील तिला एक छोटा व्हिडीओ हवा होता. ज्यात आपले जीवन, आपले प्रेम, आपली मुले यांचा सारांश होता. २०१५ चा नानुम राउडी धान हा चित्रपट नयनताराचा नवरा विघ्नेश शिवन याने दिग्दर्शित केला होता आणि धनुषच्या वंडरबार फिल्म्सने निर्मिती केला होता.

Nayanthara VS Dhanush
KBC 16 : नाना पाटेकरांनी सांगितली अमिताभ बच्चनसोबतची हृदयस्पर्शी आठवण ; म्हणाले आजही माझ्याकडे...

नयनताराने धनुषशी बोलण्याचा प्रयत्न केला

नयनताराने हे देखील उघड केले की, तिने धनुषच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला आणि त्यांना धनुषसोबत बोलायला देण्याची विनंती केली. ती म्हणाली की गेल्या १० वर्षात काय चूक झाली आहे त्यात तिला जायचे नाही, पण धनुषसोबतचे वाद संपवायचे आहेत. जेणेकरून भविष्यात जर आम्ही समोरासमोर आलो तर मी त्याला भेटू शकेल.

नयनताराने असेही स्पष्ट केले की त्यांनी अखेरीस डॉक्युमेंटरीमध्ये वापरलेले फुटेज हे एका क्रू सदस्याने घेतलेल्या पडद्यामागील शॉटचे होते. तिने असा युक्तिवाद केला की, लोकांना हे समजत नाही की पडद्यामागील फुटेज हे तेव्हा कराराचा भाग नव्हते, जसे ते आता असतात. त्यामुळे नयनताराला आशा होती की धनुष हा इतका प्रिय आणि प्रतिष्ठित अभिनेता आहे, तो हा मुद्दा सोडून देईल, परंतु ट्रेलर रिलीजनंतर त्याने हा विषय अधिक ताणून धरले असल्याचे नयनताराने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com