Chhaya Kadam : मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची कान्स चित्रपट महोत्सवानंतर आणखी एक वैश्विक झेप...

Chhaya Kadam : मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हिच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला चित्रपटाची आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे.
Chhaya Kadam
Published On

Chhaya Kadam : छाया कदम हिने २०२४ वर्षात विविध भूमिका साकारल्या आणि त्या जागतिक स्तरावर पोहचल्या ! नुकताच तिच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' ला ८२ व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन नामांकने मिळाले आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) हे पहिले नामांकन तर, दुसर नामांकन सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर (इंग्रजी नसलेली भाषा) या श्रेणीसाठी मिळाले आहे.विशेष म्हणजे या श्रेणीमध्ये भारतीय दिग्दर्शकाचे नामांकन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

छाया कदमने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'चा प्रीमियर २३ मे २०२४ रोजी कान्स चित्रपट महोत्सवात झाला होता आणि आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधी अनेक पुरस्कार पटकावले आहेत आणि आता वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवण्याचा बहुमान देखील पटकावला आहे.

काही दिवसापूर्वी 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये (NYFCC) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे आणि आता हा चित्रपट पुन्हा एक नवा पुरस्कार जिंकण्यासाठी सज्ज होताना दिसतोय.

Chhaya Kadam
Sunny Deol : सनी देओल साकारणार 'रामायण' चित्रपटात महत्वाची भूमिका; म्हणाला मला खात्री आहे की...

या बद्दल उत्सुकता व्यक्त करताना छाया कदम म्हणाली, "ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’साठी मिळालेलं गोल्डन ग्लोब नामांकन हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचतोय, याचा आनंद वाटतो. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे; तो मानवी भावना, संघर्ष आणि प्रकाशाच्या शोधाबद्दल आहे. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं. या नामांकनाने आम्हाला पुढे आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे."

Chhaya Kadam
Kalki 2898 Ad Movie : रिलीजनंतर 'कल्की 2898 एडी' चित्रपट अडचणीत? अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व कलाकारांना कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’मध्ये छाया कदम, कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट फ्रान्समधील ‘पेटीट काओस’ आणि भारतातील ‘चॉक अँड चीज’ आणि ‘अनदर बर्थ’ यांची अधिकृत इंडो-फ्रेंच सहनिर्मिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com