Pusha 2 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pusha 2 Movie: पुष्पा भाऊची महाराष्ट्रातही क्रेझ, सांगलीकरांचा सिनेमागृहात राडा, तिकीट न मिळाल्याने दगडफेक

Pusha 2 Movie: सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावामध्ये पुष्पा 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली.

Manasvi Choudhary

इंडस्ट्रीत बॉलिवूड चित्रपटापेक्षा टॉलिवूड चित्रपट वेड लावून टाकतात हे खरं आहे. आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट रिलीज झाला की प्रेक्षक देखील तुफान गर्दी करतात. नुकतंच टॉलीवूडचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा पुष्पा २ चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाने सध्या सर्वत्र धुमाकूळ केलाय.

सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावामध्ये पुष्पा 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वच सिनेमागृह हाऊसफुल झाली होती. पण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. थिएटर हाऊसफुल्ल झाल्याने तिकीट बुकिंग बंद करण्यात आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. काहींनी केबिनवर किरकोळ दगडफेक ही केली. मात्र तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहचले आणि वातावरण शांत करण्यात आले. त्यानंतर चित्रपट शांततेत सुरू झाला.

यापूर्वी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पंसती दिली होती.या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या प्रीमियर शोला प्रेक्षकांची गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये अल्लु अर्जुनला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेचा चेंगराचेगरीत मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रिमीयरला हजारो चाहते चित्रपट नाहीतर अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी जमले होते. पण, तिथे प्रचंड धक्काबुक्की झाली, चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील केला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तिचा मृत्यू झाला. 

अशातच पुष्पा सिनेमा नुकताच रिलीझ झाला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांने प्रेक्षकांनी वेड लावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT