Pushpa 2 OTT Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 OTT Release : 'पुष्पा राज' आता तुमच्या घरी, जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सची जुगलबंदी लवकरच ओटीटीवर

Pushpa 2 OTT Release Update : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता हा चित्रपट लवकरच घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

Shreya Maskar

'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट पाहण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.

'पुष्पा: द राईज' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता. याा चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर तगडी कामाई केली होती. आता तीन वर्षांनी 'पुष्पा २ द रुल'हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. 'पुष्पा 2' चित्रपटाचे शो सध्या सर्वत्र हाऊसफुल्ल पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

'पुष्पा 2' चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे. 'पुष्पा राज' तुमच्या घरी धुमाकूळ घालणार आहे. थिएटर बाहेर चित्रपटाच्या तिकिटासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. 'पुष्पा 2'चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्स विकत घेतले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2 हा चित्रपट 2025 मध्ये ओटीटीवर (Pushpa 2 OTT Release ) पाहता येणार. मात्र अद्यापही रिलीज डेट समोर आली नाही.

'पुष्पा 2' ऑनलाइन लीक

'पुष्पा 2' रिलीज झाल्यानंतर काही तासातच लीक झाला. 'पुष्पा 2' पायरसी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन लीक झाला आहे. ज्यामुळे निर्मात्यांना कोट्यावधींचा फटका बसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT