Pushpa 2 First Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 First Poster : लिंबाचा हार, जरीची साडी, नाकात नथ; अल्लू अर्जुनचा खत्री लूक पाहून तुमचाही उडेल थरकाप

उद्या अल्लू अर्जूनचा वाढदिवस असल्याने निर्मात्यांनी त्या आधीच त्याचा फस्ट लूक आणि चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

Ruchika Jadhav

Poster Release : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात आता पुष्पाचा खतरनाक किलर लूक समोर आलाय. 'पुष्पा २' या चित्रपटामधील अल्लू अर्जुनचा फ्सट लूक पोस्ट करण्यात आला आहे. उद्या अल्लूचा वाढदिवस असल्याने निर्मात्यांनी त्या आधीच त्याचा फस्ट लूक आणि चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

पुष्पाचा नवा लूक व्हायरल

पुष्पा चित्रपटामध्ये अल्लूचा लूक सुरूवातीलाच एकदम रावडी ठेवण्यात आला होता. एक खांदा खाली वाकवत त्याचा ऍटीट्यूड चाहत्यांना फार भावला. अशात आता त्याचा 'पुष्पा २' या चित्रपटातील लूक समोर आला आहे.

यामध्ये दिसत आहे की, अल्लूने साडी नेसली आहे. तसचे कपाळावर चमकणारी चंद्रकोर, ओठाला लाली, नाकात नथ, गळ्यात लिंबाचा मोठा हार त्याने घातला आहे. हा खत्री लूक पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय.

पुष्पाचा भन्नाट टीझर देखील समोर आला आहे. यामध्ये पुष्पामध्ये असलेले गुण त्याचा स्वभाव, त्याच्यासाठी जनता किती वेडी झाली आहे हे दिसते. सुरुवातीला जेलमधून तो फरार झाल्याचे त्याचे कुटुंबीय टिव्हीवरील बातम्यांमधून ऐकताना दिसत आहेत. त्यानंतर वाघ देखील पुष्पाला घाबरल्याचे दृश्य दिसत आहे.

उद्या ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी हे मोठं आणि विशेष गिफ्ट असणार आहे. 'पुष्पा २' चा टीझर आणि या चित्रपटातील अल्लूच्या लूकवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. हा लूक पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात शिगेला पोहचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High BP Causes: हाय BPचा धोका कोणत्या व्यक्तींना असतो? डॉक्टरांनी सांगितली तुमची चुकीची सवय, आताच व्हा सावध

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचं महिला अध्यक्षपद जाणार? खरात प्रकरणावर प्रफुल्ल पटेलांनी सपष्टच सांगितले

Maharashtra Live News Update: संगमनेर येथील धक्कादायक घटना, आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये या ५ खेळाडूंना जागा मिळणं कठीण; हार्दिक पंड्या घेणार मोठे निर्णय

Shiv Thakare : "नवी सुरुवात..."; मराठमोळ्या शिव ठाकरेने 'तिच्या'सोबत व्हिडीओ केला शेअर, चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT