Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun: पुष्पाकडून मदतीचा हात, 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाला देणार २५ लाख रूपये

Allu Arjun Help To Dead Woman Family: 'पुष्पा २' चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणावर आता अल्लू अर्जुनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

सध्या जगभरात 'पुष्पा २'चा (Pushpa 2 ) क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तब्बल 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे स्क्रीनिंग 4 डिसेंबर हैदराबाद येथे पार पडले. हे स्क्रीनिंग संध्या थिएटरमध्ये झाले. तेव्हा अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. येथे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी देखील झाली. मात्र या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.

अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया

अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला की, मी त्या मृत महिलेच्या कुटुंबाला भेटणार आहे. या दुःखात त्या महिलेचे कुटुंब एकटे नाही. मी त्यांच्या पाठीशी आहे. मला जे काही त्यांच्यासाठी करता येणार ते मी करेन. मी त्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. तसेच उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही उचलणार आहे.

नेमकं काय घडलं?

नुकतीच या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अल्लू अर्जुन आणि त्याची सिक्योरिटी एजन्सी तसेच थिएटरवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भातील एक व्हिडीओ अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्याने झालेल्या घटनेसंबंधित दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला मदत जाहीर केली आहे.

मृत महिला ३९ वर्षांची होती. ती आपली दोन मुलं आणि नवऱ्यासह संध्या थिएटरमध्ये चित्रपटासाठी आली होती. तेथे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. त्यात ही महिला गुदमरल्याने बेशुद्ध झाली. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अखेर तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचा मुलगा अल्लू अर्जुनचा मोठा चाहता आहे. त्याच्यासाठीच सर्व कुटुंब चित्रपट आणि अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT