Sidhu Moosewala Mother Charan Kaur Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवालाची आई ५८ व्या वर्षी पुन्हा आई होणार

Charan Kaur Pregnant: ५८ व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आई होणार आहेत. आयव्हीएफच्या मदतीने त्या आई होणार आहेत. सिद्धु मुसेवालचे काका चमकौर सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

Priya More

Sidhu Moosewala Mother Charan Kaur:

दिवंगत पंजाबी सिंगर सिद्धु मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. सिद्धु मुसेवालाच्या घरामध्ये लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्याची आई पुढच्या महिन्यामध्ये बाळाला जन्म देणार आहे. ५८ व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आई होणार आहेत. आयव्हीएफच्या मदतीने त्या आई होणार आहेत. सिद्धु मुसेवालचे काका चमकौर सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

सिद्धू मुसेवालाचे काका चमकौर सिंग यांनी सांगितले की, 'मी देवाचा आभारी आहे की आमच्या घरामध्ये लवकरच आनंदाचे वातावरण असणार आहे. घरातील प्रत्येक सदस्य देवाकडे हिच प्रार्थना करत आहे की बलकौर सिंह सिद्धूच्या घरामध्ये पुन्हा एकदा आनंद येऊ देत.' सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी सुरक्षेच्या कारणास्तव गरोदरपणाची बातमी कोणालाही सांगण्यास विरोध केला होता. पण आता त्याच्या कुटुंबातील सदस्याने या बातमीला दुजोरा दिला आहे.

पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आळी होती. गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धु मुसेवालावर मानसाच्या जवाहर गावाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिद्धू मुसेवालाचा जागीच मृत्यू झाला होता. सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आता सिद्धूच्या मृ्त्यूच्या दोन वर्षांनंतर त्याच्या घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाने दार ठोठावले आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आई होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढच्या महिन्यात त्या बाळाला जन्म देतील. सिद्धू मुसेवालाचे कुटुंबीय नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले

Ladki Bahin Yojana: नोंदणी बंद, 80 हजार अर्जही बाद, लाडकी बहिण दुहेरी संकटात

Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बुधवार पेठेत छापेमारी, पाच बांगलादेशी महिलांना अटक

Gold Factory: सोनं तयार करण्याची फॅक्टरी? आता शिशापासून तयार करता येणार सोनं?

Laptop Hacks: लॅपटॉप पावसात भिजल्यास काय करावे? प्रथम 'या' चुका टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT