दिवंगत पंजाबी सिंगर सिद्धु मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला. ५८ व्या वर्षी चरण कौर आई झाल्या आहेत. सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज शेअर केली आहे.
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावर आपल्या बाळासोबतचा फोटो पोस्ट करत गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो जीवांच्या आशीर्वादाने अनंत देवाने शुभच्या धाकट्या भावाला आपल्या मांडीवर बसवले आहे. देवाच्या आशीर्वादाने कुटुंब निरोगी आहे आणि सर्व हितचिंतकांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.'
बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, त्यांनी त्यांच्या बाळाला मांडवर घेतलं आहे. त्यांच्या बाजूला सिद्धू मुसेवालाचा फोटो ठेवाला आहे. या फोटोवर 'Legends Never Die', असं लिहिलं आहे. त्यांचसोबत त्यांनी समोर केक देखील ठेवला आहे. बलकौर सिंग यांच्या घरी मुलाच्या रूपाने सिद्धू मुसेवालाचा पुनर्जन्म झाले असल्याचे म्हटले आहे. आयव्हीएफच्या मदतीने सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे.
पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धु मुसेवालावर मानसाच्या जवाहर गावाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिद्धू मुसेवालाचा जागीच मृत्यू झाला होता.
सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या वारसाच्या हितासाठी त्याच्या पालकांनी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धूच्या भावाच्या जन्माची बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सिद्धूच्या वडिलांच्या पोस्टला सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.