Punjabi Actress Daljeet Kaur
Punjabi Actress Daljeet Kaur Saam Tv
मनोरंजन बातम्या

Punjabi Actress Daljeet Kaur : पंजाबी चित्रपटसृष्टीतील 'हेमा मालिनी'चे झाले दीर्घ आजाराने निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Punjabi Actress Daljeet Kaur Passes Away: ज्येष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दीर्घ आजाराने लुधियाना येथे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना न्यूरोलॉजिकल समस्या (मज्जासंस्थेच्या समस्या) असल्याचे निदान झाले होते. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्या मुंबईहून लुधियानात स्थलांतरित झाल्या होत्या.

कौर अनेक सुपरहिट पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये होत्या. 2013 मध्ये दलजीतने सिंग व्हीएस कौरमध्ये गिप्पी ग्रेवालच्या आईची मुख्य भूमिका साकारली होती. दलजीत कौर यांच्या निधनाची बातमी अभिनेत्री नीरू बाजवाने इंस्टाग्रामवरुन दिली आहे, तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, "#daljitkaur जी.. तुम्ही एक प्रेरणास्थान आहात... खूप दुःखद बातमी. तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी कृतज्ञ आहे #legend #heerranjha."

पंजाबमधील रायकोट येथे गुरुवारी दलजीत कौर यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबी चित्रपटसृष्टीतील 'हेमा मालिनी' नावाने प्रसिद्ध असलेल्या दलजीत कौर यांनी 'दाज', 'गिधा', 'पुट्ट जट्टन दे', 'रूप शकीनन दा', 'इशाक निमाना', 'लाजो', 'बटवारा', 'वैरी जट्ट', 'पटोला' आणि 'जग्गा डाकू' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. दलजित कौर अभिनयासोबत हॉकी आणि कबड्डी या खेळात माहिर होत्या.

त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर, अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केले आहे. गायक मिका सिंग यांनी ट्विट केले की, "पंजाबची सुंदर अभिनेत्री, लीजेंड #दलजीतकौर आपल्या सुंदर आठवणींसह निघून गेल्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तिला चिरशांती लाभो."

दलजीत कौर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले. अभिनेता सतीश शहा आणि दलजीत कौर दोघेही एकाच वर्गात होते. दलजीत कौर यांच्या निधनाची बातमी कळताच सतीशने ट्विटरवर पोस्ट लिहिली की, "एक प्रिय मैत्रिण, बॅचमेट, जुन्या काळातील पंजाबी लीड गर्लचे दलजीत कौर यांचे गुरुवारी निधन झाले. तिच्या आत्म्याला चिरशांती लाभो. FTII 1976 बॅच."

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Crime : ६ वर्षांच्या पोटच्या पोरासाठी आईच बनली काळ; नवऱ्यासोबत भांडणानंतर मगरीच्या कळपात फेकलं

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

SCROLL FOR NEXT