पंजाबमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅड संधू हत्या
अमृतसरमध्ये मॅड संधूची गोळ्या झाडून हत्या
मॅड संधू हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू
मॅड संधूवरील गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पंजाबमध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची दिवसाढवळ्या भरचौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 'मॅड संधू' असं हत्या झालेल्या इन्फ्ल्यूएन्सरचं नाव होते. शरीरात दोन गोळ्या घुसल्यामुले मॅड संधू गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पंजाब हादरले आहे. गेल्या काही दिवसांपासून मॅड संधूला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. शेवटी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॅड संधूच्या हत्येनंतरचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
पोलिस आयुक्त हरमनबीर सिंग गिल यांच्या माहितीनुसार, मॅड संधू हा पंजाब पोलिसांच्या एका निवृत्त उपनिरीक्षकाचा मुलगा होता. तो अमृतसरमध्ये राहत होता. मॅड संधू LGBTQ+ कार्यकर्ता होता. मॅड संधूने आपली कार सर्व्हिसिंगसाठी दिली होती. कार परत आणण्यासाठी २ तरुणींनी त्याला तिथे नेऊन सोडले. संधू तिथे पोहोचताच दोन तरुण मोटारसायकलवरून आले. त्यातील एकाने संधूच्या अगदी जवळ जाऊन थेट गोळ्या झाडल्या. संधूवर त्याने चार ते पाच गोळ्या झाडल्या.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. सुमारे एका तासानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे आणि ठोस पुरावे मिळाले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांना लवकरच अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मॅड संधूचे नाव यापूर्वीही वादात सापडले होते. तीन महिन्यांपूर्वी, त्याचा निहंग जथेदार मनप्रीत सिंग खालसा यांच्याशी वाद झाला होता. निहंग गटाने संधूचा पेहराव आणि सोशल मीडियावरील मजकूर पंजाबच्या संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगून त्यावर आक्षेप घेतला होता आणि इशाराही दिला होता. तसंच, एका लाईव्ह शो आणि पॉडकास्ट दरम्यान पंजाबी गायक के.एस. माखन यांच्यासोबत त्यांच्या जीवनशैलीवरून वाद झाला होता.
मॅड संधूने घटनेच्या काही तास आधी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेवटची रील शेअर केली. ही शेवटची रील पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याची हत्या करण्यात आली. पोलिस सध्या सर्व बाजू आणि वैमनस्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.