Pune  google
मनोरंजन बातम्या

Pune : दिमाखदार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, देशी-विदेशी चित्रपटांची मेजवानी

Pune International Film Festival : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव / साम टिव्ही न्यूज

चित्रपट महोत्सव हे चित्रपटांचा आणि कलाकरांचा गौरव करण्यासाठी असतात. यांच्या माध्यामातून आपण कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा सन्मान करतो. असाच एक सन्मान सोहळा पुण्यात पार पडणार आहे. पुणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याच पुण्यात आज पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात होणार आहे. अनेक चित्रपटांना येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (Pune International Film Festival) (पीफ) महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी पाच वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पीएफ डिस्टिंग्विश अवॉर्ड, तर ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस.डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही शो मॅन: राज कपूर जन्मशताब्दी वर्ष आहे. यंदा प्रख्यात चर्मवाद्य वादन विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल.

13 ते 20 फेब्रुवारी या महोत्सव कालावधीत आयोजित या चित्रपट महोत्सवात विविध देशी-विदेशी सुमारे 150 चित्रपट, जागतिक स्पर्धा विभागातील 14 आणि मराठी स्पर्धा विभागातील 7 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT