Raahgir The Wayfarers Movie: Saam tv
मनोरंजन बातम्या

Pune international film festival: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'राहगीर - द वेफरर्स'ला मिळाला उदंड प्रतिसाद

Raahgir The Wayfarers Movie: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘राहगीर - द वेफरर्स’ या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडलं. या चित्रपटात मुख्य भूमिका बजावणाऱ्या आदिल हुसैन,तिलोत्तमा शोम,नीरज काबी आणि ओंकारदास मानिकपुरी हे उपस्थित होते.

साम टिव्ही ब्युरो

Raahgir The Wayfarers Movie:

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘राहगीर - द वेफरर्स’ या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडलं. या चित्रपटात मुख्य भूमिका बजावणाऱ्या आदिल हुसैन,तिलोत्तमा शोम,नीरज काबी आणि ओंकारदास मानिकपुरी यांनी हजेरी लावली आहे. याआधी अमित अग्रवाल यांनी 'एमएस धोनी, द अनटोल्ड स्टोरी तसेच कंगना रणौतच्या 'सिमरन' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. (Latest Marathi News)

चित्रपटाची कथा काय आहे?

या चित्रपटात गरिबीने त्रस्त असलेल्या लोकांमधील भावनिक नातेसंबंधांचे चित्रण करण्यात आलंय. या चित्रपटात कलाकार उदरनिर्वाहाच्या शोधात प्रवास करताना दिसत आहे. यामुळे सिनेमा एकमेकांशी निर्माण झालेल्या नात्याभोवती फिरतो. या चित्रपटाचे 'राहगीर - द वेफेरर्स'चे चित्रिकरण झारखंड राज्यात झालं आहे. या चित्रपटाचा मोठा भाग रांची आणि नेतरहाटमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित अग्रवाल म्हणाले, 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उदंड प्रतिसाद मिळाल्याने आंगद होत आहे. या चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपटप्रेमींना एक मोठा आणि खुला व्यासपीठ मिळतोय. महोत्सवात प्रेक्षकांनी 'राहगीर' चित्रपटाचा आनंद तर घेतलाच आहे. तसेच संबंधित प्रश्नांवर आपापसात चर्चाही केली. यावरून त्यांचे चित्रपटाशी असलेले नाते अस्सल असल्याचे दिसून येते. 'राहगीर' चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सादर करण्याचा आमचा विचार आहे'.

दिग्दर्शक गौतम घोष म्हणाले, गरीब वर्गातील लोकांची कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या लोकांची स्वतःची अशी स्वप्ने आणि इच्छा मर्यादित आहेत. मोठ्या शहरांमध्ये आणि गरीब आदिवासी गावात भारतीय वास्तव कसे वेगळे आहे, सिनेमातून पाहायाला मिळणार आहे. गरीबातल्या गरीब लोकांमध्येही जिवंत असलेल्या माणुसकीची ही एक कथा आहे'.

दरम्यान, 'राहगीर: द वेफेरर्स' याआधी देखील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. याआधी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एमएएमआय - मुंबई चित्रपट महोत्सव, शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सिनेमा एशिया चित्रपट महोत्सव इत्यादी महोत्सवात दाखवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT