Ankita Walawalkar Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Video : "कठोर निर्णयांची वेळ आली!"; नसरापूर प्रकरणावर अभिनेत्री भडकली; थेट सरकारला विनंती, वाचा नेमकं काय म्हणाली?

Ankita Walawalkar On Nasrapur Case : 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालवलकरने नसरापूर प्रकरणावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. कठोर शिक्षेची मागणी केली आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.

मनोरंजन विश्वातील कलाकारांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

अंकिता वालवलकरने तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. साडे तीन वर्षांच्या चिमुकलीर ६५ वर्षांच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून तिचा खून केला. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. संतापजनक घटनेवरून 'बिगबॉस' फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवलकरने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट शेअर करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि सरकारने कठोर कायदा बनवावा, जेणेकरून अशा घटना भविष्यात होणार नाही, असं म्हणत नसरापूर प्रकरणावरून अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

अंकिता वालवलकर व्हिडीओत काय म्हणाली?

अंकिताने सुरुवातीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती म्हणाली की, ही घटना खूप गंभीर आहे. अशा घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. पूर्वी जेव्हा महाराजांच्या काळात असे काही घडायचे, तेव्हा महाराज त्यांचे हात छाटून टाकायचे, कारण ही वृत्ती छाटणे गरजेचे आहे. पण आपण मात्र अशा घटना झाल्यावर मोर्चे काढतो, निषेध नोंदवतो आणि न्याय मागतो. मात्र न्याय काही आपल्याला मिळत नाही. यात मला सरकार आणि विरोधी पक्षाला एकच विनंती करायची आहे की, अशा गुन्हेगारांसाठी आणि वृत्तींसाठी ठोस कायदा येणे खूप गरजेचे आहे. ज्याची कोणतीही पळवाट नसेल. ज्या कायदामुळे एक भीती निर्माण होऊल आणि अशी कृत्य होणे थांबेल. मी एक मुलगी, स्त्री म्हणून सर्वांच्या वतीने एकच विनंती करेन की, महिला आरक्षणासोबतच आम्हाला अशा गुन्ह्यांसाठी एक ठोस, गंभीर कायदा लवकर यावा अशी आमची अपेक्षा आहे. त्या व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी.

अंकिता वालवलकर पोस्ट

"आता सहनशीलता नाही, आता कठोर निर्णयांची वेळ आहे... अशा गुन्ह्यांसाठी जलदगती न्याय, कठोर शिक्षा आणि शून्य सहनशीलता हाच एकमेव मार्ग आहे. समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत. चूक पाहून गप्प बसणं म्हणजे त्या गुन्ह्याला पाठिंबा देणं आहे... आपल्याकडे कायदे आहेत, पण त्यांची भीती नाही. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि मग निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं... प्रत्येक मुलगी सुरक्षित असलीच पाहिजे हा तिचा हक्क आहे, कोणाचे उपकार नाहीत. मुलींवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजेत ,आत्ता आणि इथेच..."

शरद पोंक्षे यांची पोस्ट

नसरापूर प्रकरणात मराठी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ते नेमकं पोस्टमध्ये काय म्हणाले, जाणून घेऊयात. "नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा . लोकं न्याय मिळवून देतील, पण असं होणार नाही. गुन्हेगाराला शिक्षेची भितीच नाही. हा गुन्हेगार या आधीही असाच सुटला होता परत तेच तेच तेच रोज बलात्कार, लव्ह जिहादच्या जाळ्यात आमच्या माता भगिनी भरडल्या जात आहेत. अत्यंत असहाय्य आहोत आम्ही .सुचत नाही..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT