पुण्यातील अभिनेत्रीचा आणि तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू Saam Tv
मनोरंजन बातम्या

पुण्यातील अभिनेत्रीचा आणि तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू

नाकातोंडात पाणी शिरून या दोघांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - सोमवारी पहाटे गोव्यातील Goa बागा-कलंगुट येथील एका पुलावरून चारचाकी गाडी खाडीत कोसळल्याने पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडेसह Ishwari Deshpandeतिचा मित्र शुभम देडगे Shubham Dedge या दोघांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. गाडी खाडीत कोसळल्यानंतर गाडी सेंट्रल लॉक झाल्याने नाकातोंडात पाणी शिरून या दोघांचा मृत्यू झाला आहे.

ईश्वरी देशपांडे आणि शुभम देडगे यांची अनेक वर्षापासून मैत्री होती. त्यातुनच त्यांची मने जुळली होती. तसेच पुढच्या महिन्यात दोघांचा साखरपुडा होणार होता. मृत शुभम आणि ईश्वरी हे दोघे बुधवारी पुण्यातून गोव्याला फिरायला गेले होते.

हे देखील पहा -

दरम्यान, गोवा येथील अंजुना बीचकडे जात असताना आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास अरुंद रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. त्यानंतर कार खाडीमध्ये कोसळल्याने आणि सेंट्रल लॉक झाल्याने  नाकातोंडात पाणी शिरून ईश्वरी व शुभमचा मृत्यु झाला. ईश्वरी पाषाण-सुस परिसरात राहात होती. तर शुभम नांदेड सिटी परिसरात राहात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ईश्वरीला अभिनयाची आवड होती. काही दिवसांपूर्वीच तिने हिंदी आणि मराठी चित्रपटासाठीचे चित्रिकण पूर्ण केले होते.  दरम्यान, शुभम आणि ईश्वरी या दोघांची काही वर्षापूर्वी ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. त्यांनी आता साखरपुडा आणि त्यानंतर लग्न करायचे ठरवले होते. त्याआधी दोघांनी गोव्याला फिरायला जाण्याचे ठरविले होते. त्याचवेळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

मतदान केंद्रातून भाजपच्या उमेदवाराला बाहेर काढले; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा | VIDEO

Mumbai Bullet Train : ...तर मुंबईतील बुलेट ट्रेनचं काम बंद होणार?, BMC ॲक्शन मोडवर, तीन दिवसांत उत्तर मागितलं

भाजप - अजित पवार गटातील बड्या नेत्यांचे पुतणे भिडले, बीडच्या गेवराईत तणावपूर्ण वातावरण, नेमकं घडलं काय?

Devendra Fadnavis: 'होय आमच्यात मतभेद, पण...', एकनाथ शिंदेंसोबतच्या रूसव्या -फुगव्यांवर मुख्यमंत्री स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT