Priyanka Chopra to star opposite John Cena Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

John Cena च्या ड्रीम टीममध्ये प्रियांकाचा समावेश; देसी गर्लचं जॉनकडून स्वागत

Priyanka Chopra to Opposite John Cena Hollywood Movie: प्रियांका तिच्या आगामी स्पाय-थ्रिलर मालिका 'सिटाडेल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Dange

Priyanka Chopra to star opposite John Cena and Idris Elba: बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारत दौऱ्यावर होती. प्रियांका तिच्या संपूर्ण कुटुंबासह भारतात आली होती. नीता मुलशी अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्यघटना देखील प्रियांका उपस्थित होती. त्याच्यासह तिने तिच्या आगामी वेबसीरीजचे प्रमोशनल इव्हेंट देखील भारतात केले.

प्रियांका तिच्या अमेझॉन प्राइमवरील स्पाय थ्रिलर वेबसीरीज 'सिटाडेल'माध्यमातून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या, अभिनेत्री या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, तर प्रियांकाने शो रिलीज होण्यापूर्वीच अॅमेझॉन स्टुडिओसोबत आणखी एक करार केला आहे. प्रियांकाने रेस्लर अभिनेता जॉन सीना आणि अभिनेता इद्रिस एल्बा याच्यासोबत 'हेड्स ऑफ स्टेट' हा हॉलिवूड चित्रपट साइन केला आहे.

WWE सुपरस्टार Cena ने ट्विटरवर ट्विट करत ही बातमी शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, "अशी ड्रीम टीम तयार केल्याबद्दल अॅमेझॉन स्टुडिओचे आभार. 'हेड्स ऑफ स्टेट'च्या माध्यमातून इद्रिस एल्बासोबत काम करण्यासाठी आणि सर्वात नवीन कलाकार सदस्य, जगप्रसिद्ध प्रियांका चोप्राचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे."

तसेच प्रियांकानेही जॉन सीनाच्या ट्विटला उत्तर देत लिहिले, "जॉन सीनाचे इतके सुंदर स्वागत केल्याबद्दल धन्यवाद, मी सेटवर काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे! चला कमला लागूया."

'हेड्स ऑफ स्टेट' हा चित्रपट मे महिन्यात फ्लोरवर जाईल आणि इलिया नैशुलर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. चित्रपटाची पटकथा जोश अॅपेलबॉम आणि आंद्रे नेमेक यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे कथानक सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे.

प्रियांका तिच्या आगामी स्पाय-थ्रिलर मालिका 'सिटाडेल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या शोमध्ये ती रिचर्ड मॅडनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'सिटाडेल'ची निर्मिती जो आणि अँथनी रुसो यांनी केली आहे.

सिटाडेल व्यतिरिक्त, प्रियांका तिचा हॉलिवूड चित्रपट 'लव्ह अगेन' च्या रिलीजसाठी देखील तयारी करत आहे. या चित्रपटात तिचे सहकलाकार सॅम ह्यूघन आणि सेलीन डिऑन आहेत. या वर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अँथनी मॅकीसोबत 'एंडिंग थिंग्ज' नावाचा चित्रपटही देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय प्रियांका अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आलिया भट्ट आणि कतरिनासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

प्रियांकाचा नुकतीच लेक मालती मेरीसह मुंबईतील श्री सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT