Priyanka Chopra Return To India Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Return To India: प्रियांका बऱ्याच वर्षांनी मुंबईत आल्यानंतर भारावून गेली

प्रियांका तीन वर्षांनी मुंबईत परतली आहे. नुकतेच तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priyanka Chopra Latest Update: प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला आहे. प्रियांका लग्नानंतर नवऱ्यासोबत परदेशी राहत आहे. प्रियांका तीन वर्षांनी मुंबईत परतली आहे. नुकतेच तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. मायदेशी परातल्याच आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता.

परदेशात राहूनही प्रियांका तिच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे अपडेट तिच्या चाहत्यांपर्यंत पोचवत असते. ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. भारतात येत असल्याचेही तिने तिच्या इंस्टा स्टोरीमार्फत सांगितले होते.

प्रियंकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने विमानाच्या खिडकीतून एक फोटो क्लिक केला आहे आणि लिहिले आहे 'बॅक इन द बे… टचटाउन'. यासोबतच अभिनेत्रीने कारमधून जातानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला 'मुंबई मेरी जान' असे कॅप्शन दिले आहे.

प्रियांकाने तिच्या स्टोरीवरआणखी दोन फोटो टाकले आहेत, त्यामध्ये ती करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो पाहत आहे. तसेच दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने तिच्या आवडत्या चिप्सच्या पॅकेटचा फोटो शेअर केला आहे.

प्रियांका चोप्राने बोर्डिंग पासचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मुंबईत येण्याची माहिती दिली होती. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी जवळपास तीन वर्षांनी घरी परतत आहे'. प्रियांकासाठी ही ट्रिप खास असणार आहे. कारण कोरोनानंतर प्रियांका पहिल्यांदाच भारतात आली आहे.

Priyanka Chopra Instagram Story

प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. यामध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर घरी आल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

Custard Apple : सिताफळ खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Hingoli Winter Tourism: गर्दीपासून लांब, निवांत ट्रिप! हिंगोलीजवळील या Hidden ठिकाणी घ्या गुलाबी थंडीची मज्जा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT