Shah Rukh Khan And Priyanka Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख करणार हॉलिवूड पदार्पण? प्रियांका म्हणाली.. “मला या गोष्टीचा गर्व नाही...”

Shah Rukh Khan Hollywood Debut: शाहरुखच्या हॉलिवूड पदार्पणावर आता प्रियंका चोप्राने आपले परखड मत मांडले.

Chetan Bodke

Shah Rukh Khan And Priyanka Chopra: बॉलिवूडच्या किंग खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर कमबॅक केले. चित्रपटाने आतापर्यंत भारतात ६०० कोटींचा पल्ला पार केला असून, जगभरात १ हजार कोटींचा पल्ला पार केला आहे. या चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान त्याला हॉलिवूड पदार्पणाविषयी विचारण्यात आले होते.

यावेळी त्याने हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड खूप बरं असल्याचं त्याने म्हटलं आहे. शाहरुखच्या हॉलिवूड पदार्पणावर आता प्रियंका चोप्राने आपले परखड मत मांडले.

प्रियांका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे, ही वेबसीरिज २८ एप्रिल रोजी ॲमेझोन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांकाने २००२ मध्ये एका तामिळ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. कालांतराने बॉलिवूडमध्येही तिने उत्तम भूमिका साकारत आपले स्थान पक्के केले. आणि २०१६ मध्ये प्रियंकाने बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत जगभरात आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला.

मध्यतरींच्या काळात प्रियंकाने २०१९ मध्ये 'द स्काय इज पिंक' या हिंदी चित्रपटात काम केले होते. २०१६ पासून प्रियांका हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि तिने हॉलिवूडला अनेक चित्रपट आणि अनेक वेबसीरिज दिल्या आहेत. प्रियांकाने 'बेवॉच' या वेबसीरिजमध्ये काम केले आणि तिचे नशीबच पालटले. या वेबसीरिजनंतर आपल्या अभिनयाचा डंका जगभरात गाजवला.

शाहरुखच्या हॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल प्रियंका एका मुलाखतीत म्हणते, “ एकाच ठिकाणी थांबणे मला आवडत नाही. मला या गोष्टीचा गर्व नाही तर विश्वास आहे. जेव्हा मी सेटवर जाते, तेव्हा मला कळते की मी काय करत आहे, माझे काम कसे चालू आहे याबद्दल कळते. एका देशातल्या माझ्या यशाचं ओझं मी दुसऱ्या देशात नेत नाही.”

प्रियांका पुढे म्हणाली, “मी खूप प्रोफेशनल आहे. माझ्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना जर तुम्ही कामाची पद्धत विचारलीत ते ही माझ्याबद्दल तुम्हाला सांगतील. माझे वडील आर्मीत असल्याने माझ्या घरात लहानपणापासून शिस्तीचे धडे मिळत होते. नेहमीच मिळालेल्या गोष्टींवर अभिमान बाळगायला हवा, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले. हॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये मिळालेले स्थान हे माझ्या कामामुळे आहे. मी कधीच अनावश्यक आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही. मी सर्वात पहिले माझ्या कामावर लक्षकेंद्रित करते.”

प्रियांका चोप्रानेही शाहरुख खानसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले असून दोघांमध्ये चांगली मैत्री होती. शाहरुख आणि प्रियांकाने 'डॉन 2' आणि 'बिल्लू'मध्ये एकत्र काम केले होते. प्रियांकाच्या 'सिटाडेल'बद्दल बोलायचे तर, ती वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. यात लेस्ली मॅनव्हिल आणि स्टॅनले टुसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT