Pruthvik Prataap: ‘कमी फॉलोवर्स होते म्हणून मला...’ हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापचा भीषण अनुभव

Maharashtrachi Hasyajatra: माझ्या आयुष्यात मला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला आहे. चांगलं काम करून देखील माझ्या फिल्मी आयुष्यात माझ्यासोबत काही वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत.
Pruthvik Prataap
Pruthvik PrataapInstagram

Pruthvik Prataap: सध्या अवघ्या महाराष्ट्रात “महाराष्ट्राची हास्यजत्रा” ची बरीच चर्चा सुरू आहे. कार्यक्रमाप्रमाणे त्यातील सदस्यांची ही सर्वत्र चर्चा होत असते. यातील एकूण एक स्पर्धक प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अभिनयाने नाही तर त्यांच्या हसवण्याच्या शैलीसाठी त्यांची चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे. असाच एक स्पर्धक म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप. सध्या पृथ्वीक कार्यक्रमाबद्दल आणि त्याला मिळालेल्या फेमबद्दल आपले मत मांडले आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे.

पृथ्वीक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. यावेळी पृथ्वीक त्याने दिलेल्या एका मुलाखतीमुळे बराच चर्चेत आला आहे. पृथ्वीकने एका इंग्रजी संकेतस्थळाला मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणतो, “मी जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या ऑडिशनला आलो, तेव्हा मी सचिन सरांना सांगितलं होतं की, मला या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार नं करता मला संधी दिली. माझे विनोद प्रेक्षकांना आवडू लागले आणि माझा सिनेकारकिर्दितील प्रवास सुरु झाला. मला खूप आनंद आहे की मी अनेक नकार पचवूनदेखील पुन्हा कामाला लागलो.”

Pruthvik Prataap
Sameer Khakhar: बॉलिवूडला पुन्हा धक्का, 'नुक्कड' फेम समीर खाखर यांचे निधन, चाहत्यांकडून शोक व्यक्त

यावेळी पृथ्वीकने त्याच्या सिनेकारकिर्दित मिळालेल्या अपयशाबद्दल ही भाष्य केले, तो म्हणतो, “माझ्या आयुष्यात मला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला आहे. चांगलं काम करून देखील माझ्या फिल्मी आयुष्यात माझ्यासोबत काही वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत. सोशल मीडियावर माझे कमी फॉलोवर्स आहेत म्हणून माझे काही प्रोजेक्ट्स नाकारण्यात आले. तुझे सोशल मीडियावर एक लाखही फॉलोवर्स नाहीत. म्हणून तू या भूमिकेसाठीही योग्य नाही” असं काही लोकांनी मला सांगितलं.

पृथ्वीक प्रताप मराठीप्रमाणे हिंदीतदेखील झळकला आहे. बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याने झी मराठी वाहिनीवरील ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेत काम केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com