
Ananya Pandey Trolled: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मंगळवारी चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी कार्यक्रमात दिसली. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. यामध्ये अनन्या तिच्या फॅमिलीसोबत दिसून येत असून कॅमेऱ्यासमोर हटके पोज देत सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यावरून तिला खूप ट्रोल केले जात आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहे. अशातच अनन्याची बहिण अलाना पांडेच्याही लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यावेळी अनन्या तिच्या कपड्यावरुन नाही तर तिने केलेल्या एका कृत्यामुळे सर्वत्र ट्रोल होत आहे.
अनन्याचा सोशल मीडियावर सिगारेट फुंकताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अनन्याच्या बहिणीच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अनन्या पांडेचा धूम्रपान करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसत आहे. फोटोमध्ये अनन्याच्या आजूबाजूला पाहुणे दिसत आहेत आणि ती एका कोपऱ्यात धूम्रपान करताना दिसत आहे. यावरुन तिला अनेक युजर्सने ट्रोल केले आहे. बहिणीच्या मेहंदी समारंभात अनन्याने बेबी पिंक कलरचा स्कर्ट आणि एक स्ट्रॅप क्रॉप टॉप घातला होता.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, सध्या अनन्याचे आदित्य रॉय कपूरसोबत नाव जोडले जात आहे. या दोघांच्याही अफेयर्सच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.