Priyanka Chopra Photos saam tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Photos : डोळ्यात आग अन् रक्ताने माखलेले शरीर; 'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा खतरनाक लूक समोर, रिलीज डेट काय?

The Bluff Release Date : प्रियंका चोप्राच्या 'द ब्लफ' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक पाहून चाहते भारावले आहेत.

Shreya Maskar

प्रियंका चोप्राचा 'द ब्लफ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

'द ब्लफ' चित्रपटात प्रियंका चोप्राचा खतरनाक अवतार पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. प्रियंका चोप्राने बॉलिवूड सोबतच हॉलिवूड देखील गाजवत आहेत. तिच्या दमदार अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. अलिकडेच ती एस एस राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटामुळे चर्चेत होती. आता मात्र ती तिच्या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

प्रियंका चोप्राचा 'द ब्लफ' हा आगामी हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट आणि सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'द ब्लफ'मध्ये ती एका समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. याची खास पोस्ट प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिचे चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. ज्यात 'देसी गर्ल' खूपच खतरनाक दिसत आहे. फोटोंमध्ये ती खून-खराबा करताना दिसत आहे.

प्रियंकाच्या डोळ्यात आग, हातात बंदूक आणि रक्ताने माखलेले शरीर पाहून अंगावर काटा येईल. प्रियंका चोप्रा ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. तिचा हा अवतार पाहून प्रियंकाचा नवरा निक जोनासही थक्क झाला आहे. त्याने तिचे भरपूर कौतुक केले आहे. या चित्रपटात समुद्री डाकू 'ब्लडी मेरी'ची गोष्ट पाहायला मिळणार आहे. जी कुटुंबाची रक्षा करताना दिसणार आहे.

'द ब्लफ' रिलीज डेट?

'द ब्लफ' चित्रपट 25 फेब्रुवारी 2026 ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे.

'द ब्लफ' स्टारकास्ट

'द ब्लफ' चित्रपट रुसो ब्रदर्स निर्मित आणि फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित आहे. तसेच या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात प्रियंका चोप्रासोबत कार्ल अर्बन, टेमुएरा मॉरिसन आणि इस्माइल क्रूझ कॉर्डोवा यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT