Priya Marathe Saamtv
मनोरंजन बातम्या

Priya Marathe Left Show : प्रिया मराठेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेला निरोप ; व्हिडिओ शेअर करत दिली Update

Tujhech Mi Geet Gaat Aahe : अभिनेत्री प्रिया मराठी 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून आपल्या भेटीला येते.

Pooja Dange

Priya Marathe Left Tujhech Mi Geet Gaat Aahe Show : अभिनेत्री प्रिया मराठी 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून आपल्या भेटीला येते. या मालिकेत प्रिया एक नकारात्मक पात्र साकारत आहे. अभिजीत खांडकेकरच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका प्रिया साकारत आहे. पण आता प्रियाने मालिकेत काम करणार नसल्याचे सांगितले आहे. स्टार प्रवाह वाहिनीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियाने मालिके सोडत आणि का सोडत आहे हे सांगितले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने प्रिया मराठीसोबत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात प्रिया मराठे “नमस्कार, मी प्रिया मराठे प्रेक्षकहो तुम्ही मला ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात. होतात यासाठी म्हणतेय की यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही. (Latest Entertainment News)

आता मी तुमचा निरोप घेते आहे. अचानक तब्येतीची आलेली अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. ही भूमिका करताना मला खूप मजा येत होती. तुम्हालाही मोनिका खूप आवडत होती. तुम्ही त्याच्यावर प्रेमही करत होता. पण जो वेळ मी देत होते तो वेळ कुठेतरी अपुरा पडत होता.”

“बाकीच्या कलाकारांच्या वेळा, क्रिएटिव्ह टीम, प्रोडक्शन टीम, ती भूमिका इतकी डिमांडिंग होती. या सगळ्याच कारणांमुळे मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतो. पण तुम्ही मालिका पाहणं सोडू नका. कारण माझी भूमिका आता दुसरी अभिनेत्री करणार आहे.

माझ्यापेक्षा अतिशय उत्तम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही भूमिका साकारणार आहे आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या मालिकेतून एका नव्या भूमिकेतून”, असे प्रिया मराठेने म्हटलं आहे.

प्रिया मराठेने हा व्हिडिओ शेअर करताच अनेक नेटकाऱ्यानी त्यावर कमेंट केल्या आहेत. तसेच तिचे कौतुक करत तिला मिस करू कसे देखील म्हणत आहेत.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत अभिनेता खांडकेकर, उर्मिला कोठारेसह अनेक कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT