Priya Marathe Funeral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Marathe: लाडक्या मैत्रीणीला शेवटाचा निरोप; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर, हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIDEO

Priya Marathe Funeral: अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्व शोकाकुल झाले आहे. प्रियाचा अंत्यसंस्कार शनिवारी करण्यात आला. या वेळी तिच्या कुटुंबियांसह अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते.

Shruti Vilas Kadam

Priya Marathe Funeral: अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्व शोकाकुल झाले आहे. प्रियाचा अंत्यसंस्कार शनिवारी करण्यात आला. या वेळी तिच्या कुटुंबियांसह जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि कलाकार मंडळी उपस्थित होते. प्रियाच्या पार्थिवाला अंतिम निरोप देताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी होते.

प्रियाची जिवलग मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील अंत्यविधीच्या वेळी भावनांना आवर घालू शकली नाही. डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि दुःखाने दाटून आलेला तिचा चेहरा पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आले. प्रियासोबतच्या आठवणींनी व्याकुळ झालेली प्रार्थना तिला शेवटचा निरोप देताना खूपच हळवी झाली.

प्रियाच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली होती. तिच्या जाण्याने सहकलाकार, चाहते आणि चाहत्यांच्या मनात खोल दुःख दाटून आले आहे. तिला शेवटचा निरोप देताना अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसह विजू माने, अभिजित खांडेकर, ओमप्रकाश शिंदे, शाल्मली टोळ्ये, स्वप्नाली पाटील, अस्ताद काळे आदि कलाकार जड अंतकरणाने उपस्थित होती.

यासह सोशल मीडियावरूनही अनेक कलाकारांनी प्रियाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तुझं हसतं रूप कायम लक्षात राहील” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक झालेल्या तिच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT