Priya Bapat Umesh Kamat Love Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Bapat Umesh Kamat Love Story : खोटं बोलून त्याच्यासोबत पहिली भेट, दहावीत असतानाच प्रपोज; प्रिया-उमेशची प्यार वाली लव्हस्टोरी माहितेय?

Priya Bapat Birthday Special Lovestory: अभिनेत्री प्रिया बापटचा आज वाढदिवस आहे. चित्रपट, मालिका आणि अभिनयासह प्रिया बापट तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लोकप्रिय जोडी आहे. प्रिया बापट आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपट, मालिका आणि अभिनयासह प्रिया बापट तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा हे कपल त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.

प्रिया शाळेत शिकत असताना उमेश कामतच्या प्रेमात पडली होती. दहावीत शिकत असताना प्रियाला उमेश आवडायचा. अनेक मुलींचा उमेश क्रश होता. प्रिया बापट ही उमेश कामत यांची मोठी फॅन होती. सेलिब्रिटी म्हणून प्रियाला उमेश आवडू लागला. तिला त्यांच्याशी बोलायचं होतं. यावेळी प्रियाने एक युक्ती लढवली. प्रियाने उमेशकडे जाऊन मला कॉलेजमध्ये एका सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला आहे. असं सांगितलं तुम्ही इंटरव्ह्यू द्याल का असं उमेशला म्हटल्यानंतर उमेशनेही होकार दिला. दोघांनीही एकमेकांशी गप्पा केल्या यावेळी उमेशलाही कळाले की हा काही इंटरव्ह्यू नाही प्रियाला त्यांच्याशी बोलायचं होतं.

यावेळी प्रिया बालकलाकार म्हणून दे धमाल शोमध्ये काम करायची. उमेशनेही प्रियाला पाहिले होते. यानंतर 'भेट' या चित्रपटाच्या प्रिमियरला प्रिया आणि उमेशची पहिली भेट झाली. दोघेंही एकमेकांना ओळखायचे.यानंतर पु्न्हाल 'आभाळ माया' या मालिकेच्या सेटवर दोघेंही भेटले. यावेळी दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले होते. पुढे तीन वर्षांनी प्रियाने उमेशला थेट प्रपोज केलं. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT