Marathi Actress Post SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actress Post : 'दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं…' वडील-भावाच्या आठवणीत मराठी अभिनेत्रीच्या अश्रूंचा बांध फुटला

Apurva Nemlekar : 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. समुद्रकिनारी जाऊन तिने आपले मन मोकळे केलेले पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

शेवंता फेम अभिनेत्रीने अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 'बिग बॉस मराठी 4' संपल्यावर अपूर्वाने तिचा सख्ख्या भाऊ गमावला. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत राहते. नुकतीच तिने भावाच्या आठवणी शेअर करणारी पोस्ट केली आहे. नुकतेच अपूर्वाने हरिहरेश्वरला जाऊन भावाची आणि वडिलांची अस्थी विर्सजन केली आहे. भावनांनी भरलेले मन तिने व्यक्त करत एक खास पोस्ट लिहिली आहे.

अपूर्वाने भावुक पोस्ट करत लिहिलं की, सर्वांनाच माहिती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जीवनाचा निरोप घ्यावाच लागतो आणि या एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला (detachment) हे कोणाला जमलयं?

पुढे आपल्या अश्रू आवरत अपूर्वा म्हणते की, माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा त्याच वळणावर फिरून आले. श्री. क्षेत्र हरिहरेश्वर..(कोंकण दक्षिण काशी) ही तिचं जागा जिथं मी माझ्या बाबांचे आणि भावाच अस्थिविसर्जन केलं होतं आणि आज त्यांच ठिकाणी अथांग सागरावर पुन्हा एकदा उभ राहिल्यावर थंड पाण्याचा स्पर्श जेव्हा झाला. तेंव्हा जणू अस वाटलं की पप्पा आणि ओंकारला घट्ट मिठी मारली आहे आणि आज या अथांग सागरकिनाऱ्यावर दाटून आलेला ढग सुद्धा बरसला, त्याचे सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला आणि मी मनसोक्त रडले.

शेवटी अपूर्वाने लिहिलं की, आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळया emotions आपण अनुभवतो, शिकतो, अंमलात आणतो परंतु detachment हे एकमेव असं emotion आहे की ते कोणी शिकवत नाही. त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो. असो detachment जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरू राहील. परंतु जेव्हा जमेल तेव्हा यां दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावे! म्हणजे मन हलक होते. मी,पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने. लवकरच. असे म्हणतं अपूर्वाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अपूर्वाच्या या भावूक पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अपूर्वा नेमळेकर लोकप्रिय झाली. ती प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करत आहे. सध्या अपूर्वा नेमळेकर 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच ती 'बिग बॉस मराठी 4' सीजनमध्येही पाहायला मिळाली आहे. ती या पर्वाची उपविजेती देखील ठरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT