Preity Zinta Get Emotional Saam Tv
मनोरंजन बातम्या

Preity Zinta: 'ट्रॉफीची खरी हकदार तर...'; आईपीएल 2025मध्ये पंजाब किंग्सच्या पराभवानंतर प्रीती झिंटा भावुक

Preity Zinta Get Emotional: आईपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) ला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून 6 धावांनी पराभव झाला.

Shruti Vilas Kadam

Preity Zinta Get Emotional: आईपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) ला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून 6 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर संघमालक आणि अभिनेत्री प्रीती झिंटा भावुक झाली. तिचा हा भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रीती झिंटा नेहमीच आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्यात उपस्थित राहते आणि संघाला प्रोत्साहन देते. या सामन्यात पराभवानंतरही प्रीती खेळाडूंना धीर देताना दिसली. तिचे संघप्रेम पाहून अनेक नेटकरी त्यांना 'ट्रॉफीची खरी हकदार तर पंजाब किंग्स' असे म्हणत आहेत.

सामन्यानंतर प्रीती झिंटा आणि विराट कोहली यांच्यात मैदानावर एक खास भेट झाली. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला आणि हसतमुखाने एकमेकांचे अभिनंदन केले. हा क्षण कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रसंगावर चाहत्यांनी प्रीती झिंटाच्या सकारात्मकतेचे कौतुक केले.

प्रीती झिंटाच्या या भावनिक क्षणांवर चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी तिचे कौतुक केले आणि पुढील आयपीएलमध्ये त्यांच्या संघाला यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या. या पराभवानंतरही प्रीती झिंटाने दाखवलेला आत्मविश्वास आणि खेळाडूंना दिलेला धीर खरोखरच प्रेरणादायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Muslim Township: मुंबईजवळ मुस्लिम टाऊनशिप वादात; मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

Hill Station: शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग, स्वर्गाहूनी सुंदर 'हे' हिल स्टेशन पाहून मनाला पडेल भुरळ

TET Exam: टीईटी नापास शिक्षकांची नोकरी जाणार; दोन लाख शिक्षकांची चिंता वाढली

Crime News: नशेनं घेतला जीव; दारू पिण्यासाठी मागितले पैसे, बायकोनं नकार देताच डोक्यात घातली हातोडी, नाशिकमध्ये खळबळ

Maharashtra Politics : शरद पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती घेतलं 'भाजप'चं कमळ

SCROLL FOR NEXT