Pravin Tarde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी घेतलेला निर्णय वाचून छाती अभिमानाने फुलेल, शिर्डीत साई दरबारी घोषणा

Pravin Tarde - Deool Band 2 : मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आगामी चित्रपट 'देऊळ बंद २' मुळे चर्चेत आहेत. प्रवीण तरडेंनी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले आणि मोठी घोषणा केली.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज होणार.

'देऊळ बंद २' च्या टीमने साईंचे दर्शन घेतले

प्रवीण तरडेंनी मोठी घोषणा केली आहे.

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

बहुप्रतीक्षित चित्रपट 'देऊळ बंद २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा चित्रपटात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. "आता परीक्षा देवाची" अशी टॅगलाइन असलेल्या 'देऊळ बंद -2' चित्रपटात एका महिला शेतकऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे, जी स्वामींचीच परीक्षा घेते. चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून दिला जाणार आहे. हमी भाव, बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, कृषी सेवा केंद्रांची स्थिती या सर्व प्रश्नांवर भाष्य करत शेतकऱ्यांनी आता अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी भूमिकाही चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा, संघर्ष आणि आत्महत्या यांसारख्या गंभीर प्रश्नावर भाष्य करणाऱ्या 'देऊळ बंद -2' चित्रपटाची टीम शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह संपूर्ण टीमने साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थान प्रशासनाकडून टीमचा शाल आणि साईंची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

चित्रपटाची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी 'देऊळ बंद -2' या चित्रपटातून होणारी कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली. तसेच अभिनेत्याने चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवण्याचा आणि परिस्थितीनुसार बदल करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.

मीडियाशी बोलताना प्रवीण तरडे यांनी सांगितल्याप्रमाणे, "सरकार बदलत जातात, पण शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. आत्महत्या करून काहीही साध्य होत नाही. बदलत्या काळानुसार शेतीची पद्धत बदलली पाहिजे. 'देऊळ बंद - 2 ' हा सिनेमा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि या चित्रपटाची कमाईही आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहोत."

'देऊळ बंद’ या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'देऊळ बंद -2' चित्रपट २१ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत.चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT