Prashant Damle On Theaters
Prashant Damle On Theaters  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prashant Damle On Theaters: नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Chetan Bodke

Prashant Damle On Maharashtra Theaters: सध्या महाराष्ट्रातील नाट्यगृहाचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी यापूर्वी देखील सोशल मीडियावर आपले मत मांडले आहे. नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीतील नाट्यगृहाची स्थिती चांगली नसल्याची नाराजी भरत जाधव यांनी नाटकगृहात व्यक्त केली आहे. अशातच काल संध्याकाळी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि पर्ण पेठे यांचे वक्तव्य देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

नुकतेच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड झाली आहे. प्रशांत दामलेंनी यावेळी साम टिव्ही सोबत संवाद साधताना नाट्यगृहाच्या स्थितीवर भाष्य केलं आहे.

रंगभूमीवर काम करताना भरत जाधव यांना एक वाईट अनुभव आला आहे. शनिवारी रत्नागिरीत भरत जाधव यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. दरम्यान भरत जाधव यांचा ज्या नाट्यगृहात प्रयोग होता त्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंम नीट काम करत नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत. त्यांनी रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही असे देखील म्हटले आहे. (Latest Entertainment News)

तर अभिनेत्री मुक्ता बर्वे व ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमने लाइव्ह येत वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाचं व तेथील कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. नाट्यगहातील सध्याची अवस्था पाहता मुक्ताच्या लाईव्हची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. यावेळी ‘चारचौघी’च्या टीमने नाट्यगृहाची झलक दाखवली असून त्यांना तिथे काही गैरसोय दिसत नाही, नाट्यगृहाचे कर्मचारी पुरेपूर काळजी घेत असतात, असं त्यांनी सांगितलं. असं म्हणत तिने लाईव्ह केले आहे.

यावेळी प्रशांत दामलेंनी ‘साम टिव्ही’ सोबत संवाद साधताना नाट्यगृहाची होत असलेल्या दुर्दशेवर भाष्य केले आहे, प्रशांत दामले म्हणतात, “आपल्या राज्यातील नाट्यगृहांची खूपच वाईट व्यवस्था आहे, गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून मी सांस्कृतिक विभागासोबत पत्र व्यवहार केला आहे. आता त्या संबंधित वेळोवेळी बदल करण्याची माहिती देत आहे. माझी नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत यांच्यासोबत माझी बैठक झाली होती. त्यांच्याकडून मला पॉझिटिव्ह रिप्लाय पण आला आहे, येत्या २ ते ३ महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही होईल.”

नाट्यगृहांमध्ये जी सोयींची उणिवा आहे, त्या दुर होण्यासाठी किती महिन्यांचा काळ जाईल यावर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले म्हणतात, “प्रशासकिय विलंब किती होईल, याची मला खरच खात्री नाही. हे माझ्यासाठी सर्व नवीन आहे, पण लवकरात लवकर सर्व सोयी सुरू होतील अशी मला आशा आहे. या मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत हे चौघेही आद्य कर्तव्य समजून लक्ष घालत असल्याने लवकरात लवकर होईल अशी मला आशा आहे. सोबतच यामध्ये अनेक प्रशासकिय अधिकारी देखील लक्ष देत असल्याने लवकरात लवकर सर्व सोयी उपलब्ध होतील.”

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad)  निवडणुक गेल्या काही दिवसांपूर्वीच पार पडली. याचा निकाल १६ मे रोजी निकाल जाहीर झाला होता. त्या निकालात प्रसिद्ध नाटयकर्मी, ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांची निवड झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT