Mukta Barve On Theaters Condition: चारचौघीच्या कलाकारांचा नवीन व्हिडिओ आला समोर, विष्णुदास भावे नाट्यगृह दाखवत म्हणाले..

Vishnudas Bhave Natyagruha: साऊंड टेस्टिंगसाठी आलेल्या मुक्ता बर्वेने इन्स्टाग्राम लाईव्ह येत नाट्यगृहाची प्रशंसा केली.
Mukta Barve On Theaters Condition
Mukta Barve On Theaters ConditionSaam TV

Charchaughi Cast Spoke About Theaters: अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरी येथील नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थे बद्दल नाराजी व्यक्त केला असतानाच दुसरीकडे अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने नवी मुंबई महापालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची प्रशंसा केली आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहातील स्वच्छता व मेकअप रूम, साऊंड सिस्टिमच्या व्यवस्थेचे कौतुक करत इतर महानगरपालिकांनी यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने केलं आहे.

चारचौघी या नाटकाचा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात ठेवण्यात आला होता. दरम्यान साऊंड टेस्टिंगसाठी आलेल्या मुक्ता बर्वेने इन्स्टाग्राम लाईव्ह येत नाट्यगृहाची प्रशंसा केली. नाट्यगृह व्हॅक्युम क्लिनरने साफ करण्यात येत होत. यावरून इम्प्रेस होत मुक्ताने लाईव्ह सुरू केलं होत. (Latest Entertainment News)

Mukta Barve On Theaters Condition
Rita Reporter Comeback: 'तारक मेहता'मधील रिटा रिपोर्टर पुन्हा येतेय; ४ वर्षेनंतर या मालिकेत करतेय कमबॅक

या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये मुक्ताने विष्णुदास भावे नाट्यगृहाविषयीच्या अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यात नाट्यगृहाची स्वच्छता, मेकरूपमधील सुविधा, स्वच्छ स्वच्छतागृहे, उत्तम साऊंड सिस्टम आणि एसी याचा उल्लेख मुक्ताने केला.

तसेच या नाट्यगृहाची खास बाब म्हणजे या नाट्यगृहातील मेकअप रूममध्ये टीव्ही आहेत. त्यामुळे कलाकारांना स्टेजवर काय सुरु आहे याची कल्पना असते.

मुक्ताच्या या लाईव्हला चारचौघी या नाटकातील सर्व कलाकार जॉईन झाले. रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, श्रेयस राजे, पार्थ केतकर या सर्वांनी नाट्यगृहाचे कौतुक केले. तसेच या प्रशासनाकडून इतर नाट्यगृहांनी प्रेरणा घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले.

तसेच मुक्ता बर्वेने लाईव्हच्या सुरुवातीलाच म्हटलं नेहमी आपण तक्रार करायला येतो आज मी कौतुक करायला आले आहे. शनिवारी रात्री भरत जाधव यांनी रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच रत्नागिरीत पुन्हा येणार नाही असे देखील म्हटले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com