Prashant Damle  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prashant Damale: प्रशांत दामले यांचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मान

प्रशांत दामले यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हस्ते गौरव.

Pooja Dange

Prashat Damale Received Sangeet Natak Academy Award: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते काल संगीत नाटक अकादमी सोहळा पार पडला. अभिनेतर प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजनन दिल्ली येथे करण्यात आले होते.

अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रशांत दामले यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

प्रशांत दामले यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे. 'हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे.'

अभिनेत्री कविता मेढेकर हिने सुद्धा प्रशांत दामले यांचे अभिनंदन केले आहे. कविता य्यानी देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच कविता यांनी 'खूप अभिमानाचा क्षण!!! अभिनंदन प्रशांत!!!' असे त्यांच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. पोस्टवर अनेक कलाकार तसेच रसिक प्रेक्षक कमेंट करून अभिनंदन करत आहेत.

अभिनेते जयवंत वाडकर यांनी देखील प्रशांत दामले यांचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रशांत दामले मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी ३ दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नाटकच १२००० प्रयोग पार पडला. सध्या त्यांचं 'एकाची लग्नाची पुढीची गोष्ट' हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT