Urfi New Look
Urfi New Look Instagram @urf7i

Urfi Javed New Look: 'तुला पाहून चेटकीणही घाबरेल', उर्फीचा अवतार बघून नेटकऱ्यांनाही वाटली भीती

उर्फीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

Urfi New Look Getting Viral: उर्फी जावेद कधी काय करेल याचा नेम नाही. तिचे कपडे तिचं बेधडक वक्तव्य यामुळे ती नेहमीच चर्चेत असतं. एखाद्यानं उर्फीकडे कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी ती समोर येतेच. उर्फी सध्या एका वेगळ्या लूकमुळे चर्चेत आहे. नेहमी फॅशनेबल आणि ग्लॅमरस दिसणारी उर्फी आज मात्र भयंकर दिसत आहे.

उर्फीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तिचा लूक पाहून तुम्ही घाबरून जाल. कारण उर्फीने चक्क तिच्या भुवया उडवल्या आहेत. तर केसांनी गुलाबी रंग दिला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की उर्फी कशी दिसत असेल ते.

Urfi New Look
Chiranjeevi Post: बाप से बडकर बेटा..! चिरंजीवींनी केलं Ram Charan चं कौतुक, हे आहे खास कारण

उर्फीने 'द डर्टी मॅगझीन'साठी हे शूट केले आहे. या मासिकाने त्यांच्या सोशल मीडियावर उर्फीच्या शूटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. उर्फीने याआधी देखील डर्टी असे लिहला एक टॉप घालून व्हिडिओ शेअर केला होता. या मासिकासाठी उर्फीचा हा पहिला व्हिडिओ नसून गेले काही दिवस उर्फी या मासिकासोबत काम करताना दिसत आहे.

परंतु उर्फी जरी तिचे काम करत असली तरी लोक मात्र तिला ट्रोल करत आहेत. तिला कोण चेटकीण म्हणत आहे तर कोण अॅनाबेला म्हणत आहेत. तर एका नेटकऱ्याने 'मी एका मिनिटांसाठी घाबरलोच' असे म्हटले आहे. नेटकरी उर्फीला ट्रोल करत असले तरी तिचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उर्फी 'बिग बॉस ऑनलाईन'मध्ये दिसली होती. त्यानंतर ती काही हिंदी मालिकांमध्ये देखील दिसली होती. नुकतीच उर्फी स्पिट्सविलामध्ये देकील सहभागी झाली होती. आता उर्फी 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील झळकणार असल्याची चर्च आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com