Prasad Oak Look In From Parinirvan Instagram @oakprasad
मनोरंजन बातम्या

Prasad Oak New Look : डोळ्यावर चष्मा, अंगात सदरा-धोतर; महामानवाच्या 'परिनिर्वाण' दिनावर आधारित चित्रपटातील प्रसाद ओकचा लूक व्हायरल

Prasad Oak Share Video: प्रसाद ओक 'परिनिर्वाण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pooja Dange

Prasad Oak New Look In Parinirvan Out : प्रसाद ओक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शन अशा सगळ्याच क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट असा प्रसाद ओकचा प्रवास होता. प्रसाद नेहमीच अभिनयाने सर्वांची मने जिंकत असतो.

प्रसाद ओक 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येत असतो. नुकतीच एक पोस्ट करून प्रसादने त्याच्या नव्या भूमिकेविषयी सांगितले आहे.

प्रसाद ओकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसाद ओक 'परिनिर्वाण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या चित्रपटामध्ये प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असणारा आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रसादने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत उपडेट शेअर केली आहे. प्रसादने या व्हिडीओतुन त्याचा पहिला लूक शेअर केला आहे.

या पोस्टसह प्रसाद ओकने लिहिले आहे की, #परिनिर्वाण वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करुन “परिनिर्वाण” ची तयारी सुरु झालेली आहे… मोठ्ठया जबाबदारीची जाणीव झालेली आहे… महामानवाचा आशीर्वाद पाठीशी आहेच… तुमच्या शुभेच्छांची आणि प्रेमाची गरज आहे…!!!

प्रसाद ओक आगामी चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रदर्शित होणार आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटामध्ये प्रसाद ओकसह, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिक वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak: नॅशनल क्रश गिरिजा ओकबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

SCROLL FOR NEXT