Prasad Jawade Instagram @prasadjawade
मनोरंजन बातम्या

Prasad Jawade Serial: 'काव्यांजली' मालिकेतून प्रसाद जवादेची एक्झिट; तर हा अभिनेता साकारणार 'प्रितम'ची भूमिका

Kavyanjali Marathi Serial: प्रसाद जवादे 'काव्यांजली' मालिकेतून एक्झिट घेणार.

Pooja Dange

Prasad Jawade Exit From Kavyanjali:

दोन बहिणींच्या जीवनावर आधारित कलर्स मराठीवरील काव्यांजली - सखी सावली' हे मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींमधील प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे.

अभिनेता प्रसाद जवादेने देखील या मालिकेतून आपल्या भेटीला आला होता. परंतु प्रसाद आता ही मालिका सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मराठी टेली बझ या इंस्टाग्राम पेज एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी प्रसाद जवादे 'काव्यांजली' मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे सांगितले आहे. तर त्याच्या जागी आता आपल्याला या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य दिसणार असल्याची माहिती देखील मराठी टेली बझने दिली आहे. (Latest Entertainment News)

प्रसाद जवादे या मालिकेत काव्याच्या दिराची भूमिका साकारत होता. आता या भूमिकेत अभिनेता आदिश वैद्य साकारणार आहे. आदिश वैद्य मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवर देखील काम करतो. त्याने नुकतीच 'सवी की सवारी' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आदिश 'रात्रीस खेळ चाले, कुंकू, टिकली आणि टॅटू यासह अनेक मराठी मालिकांमध्ये दिसला होता.

प्रसाद जवादे विषयी बोलायचे झाले तर प्रसाद जवादे सध्या त्याचे केळवण एन्जॉय करत आहे. अभिनेत्री अमृता देशमुख आणि त्याचा साखरपुडा पार पडला आहे. १८ नोव्हेंबरला २०२३ साली लग्न ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT