Prakash Raj's comment on Chandrayaan-3 Saam TV
मनोरंजन बातम्या

Prakash Raj On Chandrayaan-3: प्रकाश राज यांनी 'चांद्रयान 3'ची उडवली खिल्ली; संपतापलेल्या नेटकऱ्यांनी अभिनेत्याला चांगलेच सुनावले

Prakash Raj: प्रकाश राज त्यांच्या अभिनयसह बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prakash Raj's Comment On Chandrayaan-3:

दक्षिणात्या अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे. प्रकाश राज त्यांच्या अभिनयसह बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. प्रकाश राज सोशल मीडियावर सक्रिय असतात तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांची मते मांडत असतात.

चंद्रयान-३ ने लँडिंग करण्यापूर्वी लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) वापरून ही फोटो काढले होते तेव्हा प्रकाश राज यांनी इस्रोच्या माजी प्रमुखांची खिल्ली उडवली आहे. हे फोटो चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावरील त्या ठिकाणची आहेत, जिथे चांद्रयान-3 चे लँडर विक्रम उतरणार आहे.

इस्रोच्या प्रमुखांची खिल्ली उडवणारे प्रकाश राज स्वतःच चेष्टेचा विषय झाले आहेत. आता लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. अलीकडेच, प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटरवर चांद्रयान-3 ची खिल्ली उडवणारा एक फोटो शेअर केला होता. , ज्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटरवर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे एक व्यंगचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून चहा ओतताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले, 'ब्रेकिंग न्यूज!

प्रकाश राज यांची कार्टून पोस्ट पाहून एका यूजरने प्रकाशच्या या पोस्टवर कमेंट करत 'लाज बाळग' असे एकाने लिहिले की, 'तुम्हाला डॉक्टरांकडून तपासून घेण्याची गरज आहे'. पण तरीही ते तुमच्या आजारी विचारांना बरे करू शकणार नाही.

तसेच दुसऱ्या एका यूजरने प्रकाश (Actor) यांना देशद्रोही म्हणत लिहिले, तुम्ही इथेच जेवता आणि इथलाच वाईट विचार करता? तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'चांद्रयान-3 ही अशी गोष्ट आहे की, राजकीय विचारसरणीची पर्वा न करता संपूर्ण भारताला अभिमान वाटावा. राजकीय विरुद्ध राष्ट्रीय ट्रोलिंगमधील भान असू द्या. एकाने लिहिले आहे, 'एखाद्याचा द्वेष करणे आणि आपल्या देशाचा द्वेष करणे यात फरक आहे. तुम्हाला असे बोलताना पाहून खूप वाईट वाटले! ,

एकाने लिहिले, 'हे दुःखद आहे. इस्रो आणि चांद्रयान-3 चे हे अशा दुर्मिळ गोष्टींपैकी एक आहे जे कोट्यवधी लोकांच्या हृदयात एकता, उत्कटता आणि आशावाद जागे करते. जर तुम्ही ते साजरे करू शकत नसाल तर एखाद्या व्यक्तीबद्दलचा तुमचा द्वेष हा तुमच्या राष्ट्रावरील प्रेमापेक्षा जास्त आहे.'

त्याचप्रमाणे सोशल मीडिया युजर्स चांद्रयान-3 ची खिल्ली उडवल्याबद्दल प्रकाश यांना सतत ट्रोल करताना दिसत आहेत. प्रकाश राज हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय ते अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. 'वॉन्टेड', 'दबंग 2', 'सिंघम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.

प्रकाश राज हे सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परखड टीकाकार आहेत. ते 2019 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले पण त्यांचा पराभव झाला. सध्याच्या सरकारला विरोध करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

SCROLL FOR NEXT